अश्विनने मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम; आता पुढच्या स्वारीवर
क्रीडा

अश्विनने मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम; आता पुढच्या स्वारीवर

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियात होत असलेल्या दुसऱ्या कसोटी मालिकेत भारताने चांगली कामगिरी केली आहे. या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आर. अश्विनने मार्नस लाबुशेनची पहिली विकेट घेतली. तेव्हाच एका विक्रमाला गवसणी घातली आहे. अश्विनने पाकिस्तानी दिग्गज बॉलर वकार युनूसचा विक्रम मोडित काढला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आता अश्विनच्या निशाण्यावर वेस्ट इंडिजचे माजी फास्ट बॉलर माल्कम मार्शल यांचा विक्रम आहे. अश्विनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी तीन विकेट घेतल्या होत्या, त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195धावांवर ऑल आऊट केला होता, यानंतर भारताने 326 रन केले. भारताला पहिल्या इनिंगमध्ये 131 रनची आघाडी घेतली. दुसऱ्या इनिंगमध्ये अश्विनने लाबुशेनला आऊट केलं.

अश्विनने लाबुशेनला आऊट करताच त्याने वकार युनूसला मागे टाकलं. वकारने टेस्ट क्रिकेटमध्ये 373 विकेट घेतल्या आहेत. अश्विनची ही 73 वी टेस्ट मॅच आहे, तर वकारने 87 टेस्ट मॅचमध्ये 373 विकेट घेतल्या होत्या. अश्विनच्या निशाण्यावर आता वेस्ट इंडिजच्या माल्कम मार्शल यांचं रेकॉर्ड आहे. मार्शल यांच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 376 विकेट आहेत, मार्शल यांनी 81 टेस्टमध्ये एवढ्या विकेट घेतल्या. मेलबर्न टेस्टमध्ये खेळत असलेला दुसरा ऑफ स्पिनर नॅथन लायन याने टेस्टमध्ये 394 विकेट घेतल्या आहेत. अश्विन हा कसोटी क्रिकेटमधला भारताचा चौथा यशस्वी गोलंदाज आहे.

सर्वाधिक बळी घेणारे भारतीय गोलंदाज
१) अनिल कुंबळे (619 विकेट)
२) कपिल देव (434 विकेट)
३) हरभजन सिंग (417 विकेट)
४) आर अश्विन 376 विकेट

टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरन याच्या नावावर आहे. मुरलीधरन याने टेस्ट क्रिकेटमध्ये 800 विकेट घेतल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अश्विन 20 व्या क्रमांकावर आहे.