माजी हॉकीपटू रवींदर पाल सिंह कोरोनामुळे काळाच्या पडद्याआड
क्रीडा

माजी हॉकीपटू रवींदर पाल सिंह कोरोनामुळे काळाच्या पडद्याआड

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचे माजी सदस्य रवींदर पाल सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ६५ वर्षांचे होते. मॉस्को ऑलिम्पिक १९८०च्या सुवर्णपदक विजेत्या संघाचे सदस्य होते. १९८४मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या रवींदर पाल यांना २४ एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मॉस्को आणि लॉस एंजेलिस ऑलिम्पिकखेरीज सिंग यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी १९८० आणि १९८३, रौप्य महोत्सवी १०-नेशन कप (हाँगकाँग १९८३), वर्ल्डकप (मुंबई, १९८२) अशा अनेक आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही प्रतिनिधित्व केले होते. १९७९मध्ये ज्युनियर विश्वचषक संघात त्यांचा समावेश होता करण्यात आला होता. केंद्रिय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनीही याबाबत ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

सिंग यांची भाची प्रज्ञा यादव यांनी बुधवारी रवींदर पाल सिंग यांच्यासाठी हॉकी इंडियाकडे आर्थिक मदतीची विनंती केली. फेडरेशनच्या अध्यक्षांनी त्यांच्यावरील उपचार आणि रुग्णालयातील खर्चासाठी पाच लाख रुपये मंजूर केले.