सर रविंद्र जाडेजाने तोडला महेंद्रसिंह धोनीचा विक्रम
क्रीडा

सर रविंद्र जाडेजाने तोडला महेंद्रसिंह धोनीचा विक्रम

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा त्याचा फॉर्म सिद्ध केला. शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या टी-20 सामन्यात जडेजाने डेथ ओव्हर्समध्ये धडाकेबाज फलंदाजी करत 23 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने जाडेजाने 44 धावा चोपल्या. भारताला पहिल्या टी-20 सामन्यात विजय मिळवून देण्यात जडेजाचं महत्त्वपूर्ण योगदान होतं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यादरम्यान, रवींद्र जडेजाने धोनीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम धोनीच्या नावावर होता. 2012 मध्ये धोनीने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 18 चेंडूत 38 धावा चोपल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात जडेजादेखील सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यावेळी त्याने 23 चेंडूत 44 धावा फटकावल्या आणि धोनीचा रेकॉर्ड मोडित काढला आहे.

दरम्यान, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय मिळवला आहे. यासह टीम इंडियाने 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडीदेखील घेतली आहे. टीम इंडियाने सलामीवीर के. एल. राहुल (51 धावा) आणि रवींद्र जडेजा या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाला निर्धारित 20 षटकांमध्ये 7 विकेट्स गमावून 150 धावाच करता आल्या.