धोनी-जडेजामधलं भांडण गेलं टोकाला, IPLमधल्या त्या एका निर्णयामुळे मैत्री तुटली!
क्रीडा

धोनी-जडेजामधलं भांडण गेलं टोकाला, IPLमधल्या त्या एका निर्णयामुळे मैत्री तुटली!

मुंबई: आयपीएलच्या १५व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या रविंद्र जडेजा (ravindra jadeja )ने एक मोठा धक्का दिला आहे. सीएसके(CSK)च्या या माजी कर्णधाराने इस्टाग्रामवरून आयपीएल २०२१ आणि २०२२ मधील सर्व फोटो काढून टाकले आहेत. जडेजाच्या या निर्णयामुळे फक्त चेन्नई संघाच्या नाही तर क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आयपीएलच्या १५व्या हंगामाच्या दोन दिवस आधी धोनी(ms dhoni )ने चेन्नईचे कर्णधारपद सोडले होते आणि जडेजाकडे नेतृत्व सोपवले होते. पण कर्णधार म्हणून जडेजाची कामगिरी चांगली झाली नाही. एका बाजूला संघाचा पराभव आणि दुसऱ्या बाजूला स्वत:ची खराब कामगिरी यामुळे हंगामाच्या मध्येच पुन्हा धोनीने कर्णधारपद स्विकारले.

जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईने ८ पैकी ६ लढती गमावल्या. त्याची स्वत:ची कामगिरी देखील नेहमी प्रमाणे झाली नाही. १० सामन्यात २०च्या सरासरीने फक्त ११६ धावा तर ७.५१च्या इकॉनमी रेटने फक्त ५ विकेट मिळवल्या. कर्णधारपद सोडल्यानंतर काही दिवसात दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर व्हावे लागले. तेव्हा अशी देखील चर्चा होती की जडेजाला संघाबाहेर करण्यात आले.

आता आयपीएल झाल्यानंतर ३ महिन्यांची ही गोष्ट लक्षात आली आहे की जडेजाचा प्रोफाइल आता येलो आर्मी वाला नाही. इतक नाही तर ७ जुलै रोजी धोनीच्या वाढदिवसाला त्याने शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. याआधी जडेजाने धोनीला प्रत्येक वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या होत्या. एका चाहत्याने लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जडेजाने या वर्षी धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. जो तो दरवर्षी देत असतो. त्याच बरोबर त्याने इस्टाग्रामवरून चेन्नईशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. याचा अर्थ सर्व काही ठीक नाही.

अन्य एका युझरने म्हटले आहे की, जडेजा २०२३च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार नाही. त्याने चेन्नई संदर्भातील सर्व पोस्ट काढून टाकल्या आहेत. दीपक चहल आणि अंबाती रायडू यांच्याबाबत देखील असेच वृत्त समोर येत आहे. मात्र त्याला अजून दुजोरा मिळाला नाही. चेन्नईच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे.

आयपीएलमध्ये दुखापत झाल्यानंतर जडेजा भारतीय संघाकडून देखील खेळला नव्हता. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत तो संघात परतला. या कसोटीत पंतसोबत २२२ धावांची भागिदारी केली, स्वत: शतक देखील पूर्ण केले.

काय झाले जडेजाला?

जडेडाला कर्णधारपदावरून हटवल्याने तो नाराज झाल्याची चर्चा आहे. यामुळेच चेन्नईशी संबंधित सर्व पोस्ट त्याने डिलीट केल्याची चर्चा आहे. एजबेस्टन कसोटीत शतक केल्यानंतर तो म्हणाला होता की, आयपीएल माझ्या डोक्यात नव्हते. जेव्हा तुम्ही भारताकडून खेळता तेव्हा तुमचे पूर्ण लक्ष भारतीय संघावर असले पाहिजे. माझ्यासाठी देखील हेच असते. भारतासाठी चांगली कामगिरी करण्यापेक्षा दुसरे समाधान नाही.