पंतने मोडला धोनीचा विक्रम; त्या यादीत आता पहिल्या स्थानावर
क्रीडा

पंतने मोडला धोनीचा विक्रम; त्या यादीत आता पहिल्या स्थानावर

ब्रिस्बेन : चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात एक धाव घेताच ऋषभ पंतनं कसोटीत एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. एक हजार धावा करताच पंतने भाराताचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. कसोटीत सर्वात वेगवान धावा करण्याचा भारतीय यष्टीरक्षकाचा विक्रम पंतने आपल्या नावावर केला आहे. याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऋषभ पंतनं २७ व्या डावांत १००० धावा करण्याचा पराक्रम केला आहे. धोनीनं ३२ डावांत कसोटीमध्ये १००० धावा केल्या. धोनीनं माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनिअरचा विक्रम मोडीत काढला होता. फारुख इंजिनिअरनं ३६ डावांत एक हजार धावा केल्या आहेत. वृद्धीमान साहानं ३७ डावांत एक हजार धावांचा टप्पा पार केला होता.

आपल्या कसोटी कारकिर्दीत ऋषभ पंतनं २७ व्या डावांत एक हजार धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं दोन शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं आहे. बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनी कसोटी सामन्यात त्यानं ९७ धावांची खेळी केली होती.