रोहित-गिलचा पराक्रम! तब्बल ११ वर्षांनी केला हा विक्रम
क्रीडा

रोहित-गिलचा पराक्रम! तब्बल ११ वर्षांनी केला हा विक्रम

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताला चांगली सुरूवात मिळवून दिली. पण खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर हे दोघे माघारी परतले. पण या दोघांनी एक पराक्रम केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील आपला पहिलाच सामना खेळणारा रोहित शर्मा शुबमन गिलसोबत मैदानावर आला. या दोघांनी ७० धावांची दमदार भागीदारी केली. दोघेही शांत आणि संयमी खेळ करत होते. या दोघांनी २७ षटके एकत्र खेळली. भारतीय सलामीवीरांनी आशिया खंडाबाहेर कसोटी क्रिकेट खेळताना २० पेक्षा जास्त षटकं खेळण्याचा योग तब्बल ११ वर्षांनंतर जुळून आला. याआधी २०१० साली दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियन मैदानावर विरेंद्र सेहवाग-गौतम गंभीर जोडीने असा पराक्रम केला होता.

रोहित शर्मा-शुबमन गिल जोडीने आणखी एक पराक्रम केला. पहिल्या दोन कसोटींमधील चार डावांत मिळून भारतीय सलामीवीरांनी जेवढी षटके खेळली त्यापेक्षा जास्त षटकं रोहित-गिल जोडीने एकाच डावात खेळली. पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, शुबमन गिल या तीन सलामीवीरांनी एकूण मिळून पहिल्या दोन कसोटीत म्हणजे चार डावांत ८.५ षटके खेळली होती. रोहित-गिल जोडीने पहिल्याच डावात २७ षटके खेळपट्टीवर तग धरला.