रोहित शर्मा करणार मोठी घोषणा… पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी होणार मोठा धमाका
क्रीडा

रोहित शर्मा करणार मोठी घोषणा… पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी होणार मोठा धमाका

दुबई : आशियाच चषक स्पर्धेत रोहित शर्माला आतापर्यंत मोठी खेळी करता आलेली नाही. पण रोहित आता येत्या तीन दिवसांमध्ये एक मोठी घोषणा करणार असल्याचे समोर आले आहे. रोहित ४ सप्टेंबरला एक मोठी घोषणा करणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

https://www.instagram.com/p/Ch931HaobuB/

विवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकातील दुसरा सामना होईल, असे म्हटले जात आहे. पण या सामन्यापूर्वी रोहित एक मोठी घोषणा करणार आहे. या घोषणेनंतर सर्वांनाच एक मोठा धक्का बसू शकतो. रोहितने या गोष्टीचे संकेत आता सोशल मीडियावर दिले आहेत. त्यामुळे काही जणांना या गोष्टीचा अंदाज आला असेल. पण रोहित रविवारी नेमकं करणार तरी काय, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे.

रोहितचे एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोमध्ये starting Rohit Sharma असे म्हटले गेले आहे. त्यानंतर मेगा ब्लॉकबस्टर असेल मोठ्या अक्षरात लिहिण्यात आले आहे आणि ट्रेलर हा ४ सप्टेंबरला रिलिज होईल, असे म्हटले गेले आहे. त्यामुळे रोहितचा नवीन सिनेमा येतोय का, असे चाहत्यांना वाटत आहे. काही चाहत्यांना रोहितने नवीन निर्मिती संस्था काढल्याचे म्हटले आहे. पण रोहित नेमकं करणार काय, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आत सर्वांनाच उत्सुकता असेल ती ४ सप्टेंबरची. कारण त्याचवेळी ही गोष्ट स्पष्ट होऊ शकेल. त्यामुळे आता रविवारी रोहित का घोषणा करणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. रोहित एका सिनेमात अभिनय करणार असल्याचे समजते आहे, पण याबाबत अजूनही कोणी अधिकृत घोषणा केलेली नाही.