आरसीबीला धक्का; ओपनर खेळाडूला कोरोनाची लागण
क्रीडा

आरसीबीला धक्का; ओपनर खेळाडूला कोरोनाची लागण

बंगळुरु : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा सलामीवीर युवा खेळाडू देवदत्त पडिक्कलची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता तो सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या हंगामात देवदत्तने आयपीएल पदार्पण केले आणि सलामीवीर म्हणून त्याने एक जबरदस्त कामगिरी केली. बीसीसीआयच्या एसओपीनुसार, एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास, त्याला कमीतकमी 10 दिवस वेगळे राहावे लागेल. मागील वर्षी देवदत्तने आरसीबीसाठी भन्नाट कामगिरी केली होती. त्याने 15 सामन्यात 5 अर्धशतकांसह 473 धावा केल्या होत्या.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, देवदत्तला क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात आरसीबी आपला पहिला सामना 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे बलाढ्य मु्ंबईविरुद्धच्या सामन्यात देवदत्तची अनुपस्थिती संघासाठी घातक ठरेल. त्याचबरोबर देवदत्तच्या जागी आरसीबीकडून आता सलामीला कोण येणार हा प्रश्न आहे.