“अब्बू, अर्जुन तेंडुलकर किती नशिबवान आहे ना?” सरफराज खानच्या वडिलांनी सांगितला तो भावुक प्रसंग
क्रीडा

“अब्बू, अर्जुन तेंडुलकर किती नशिबवान आहे ना?” सरफराज खानच्या वडिलांनी सांगितला तो भावुक प्रसंग

मुंबई: फेब्रुवारीमध्ये भारतात ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत हे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठीचे सामने खेळवले जाणार आहेत. या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली कसोटी सामन्यासाठी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.या सामन्यांसाठी फलंदाज सरफराज खानला संघात संधी मिळेल, अशी आशा होती, मात्र त्याची घोर निराशा झाली आहे. या कसोटी मालिकेत सूर्यकुमारला पदार्पणाची संधी दिली पण या फलंदाजाला संघात स्थान दिले गेले नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करूनही त्याला संधी न मिळाल्याचे दुःख त्याने उघडपणे मांडले आहे. एका मुलाखतीत सरफराज खानने सांगितले की, मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी त्याला वाट बघण्यास सांगितले होते, सोबतच तुला लवकरच संधी मिळेल, असेही म्हणाले. सरफराज खानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी निवड न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

सरफराज खान म्हणाला की, संघाची घोषणा झाल्यानंतर मी एकटा पडलो आणि मी खूप रडलो, कारण मला सांगूनही माझी निवड झाली नाही. त्याने सांगितले की, मुंबईतील एका हॉटेलमध्ये चेतन शर्मा यांची भेट घेतली होती. यादरम्यानही चेतन शर्माने निराश होऊ नको, तुला संधी मिळेल, असे सांगितले होते. मी स्वतःला सारखा विचारात होतो त्याच विचारनमध्ये होतो की मी संघात का नाही, पण वडिलांशी बोलल्यानंतर मला धीर आला.’

सरफराज खानचे वडील नौशाद खान यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्यांच्या मुलाचा एक हृदयस्पर्शी किस्सा सांगितला आणि हा किस ऐकून सर्वच एक शांतता पसरली. ‘सरफराज अनेकदा सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरसोबत किंवा त्याच्या विरूद्ध ज्युनियर संघातून क्रिकेट खेळत असे. एके दिवशी असंच खेळताना लहान सरफराजने मला येऊन सांगितले की, अब्बू अर्जुन किती नशिबवाला आहे ना? की तो सचिन सरांचा मुलगा आहे आणि त्याच्याकडे कार, आयपॅड, सर्व काही आहे’ त्यांच्या मुलाचं हे बोलणं ऐकत नौशाद खान अगदी भावुक झाले होते.

ऐकून नौशाद खान गहिवरले

लहान सरफराज खानच्या त्या प्रश्नाला उत्तर देताना त्याच्या वडिलांनी केवळ होकार दिला होता. इतर काही बोलण्यासाठी त्यांच्याकडे शब्दचं नव्हते. पण तेवढ्यात लहानसा सरफराज धावत त्यांच्याजवळ येत त्यांना घट्ट मिठी मारली. सरफराजनेही भावुक होत वडिलांना मते, ‘ मी तर त्याच्यापेक्षा भाग्यवान आहे, कारण तुम्ही संपूर्ण दिवस माझ्यासाठी देऊ शकता. त्याचे वडील त्याला पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत.’ त्याचे हे वाक्य ऐकून त्याच्या वडिलांनाही गहिवरून आले.

सरफराज खानने ३६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ८०.४७ च्या सरासरीने ३३८० धावा केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *