क्रीडा

मिसबाहच्या जागी शोएब अख्तरला मिळणार मोठी संधी

रावळपिंडी : पाकिस्तान क्रिकेटमध्ये शोएब अख्तरला मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. रावळपिंडी एक्सप्रेस नावाने ओळख असलेल्या अख्तरला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. Cricket Baaz या यू-ट्युब कार्यक्रमात बोलत असताना शोएब अख्तरने या वृत्ताला दुजोला दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या मिसबाह उल-हक कडे पाक क्रिकेट बोर्डाचं निवड समिती प्रमुख आणि मुख्य प्रशिक्षक अशी दोन्ही महत्वाची पदं आहेत. परंतु, नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानची कामगिरी अतिशय खराब झाली. ज्यामुळे पाक क्रिकेट बोर्ड मिसबाहची निवड समिती प्रमुख पदावरुन उचलबांगडी करण्याच्या तयारीत आहे.

शोएब अख्तरने या वृत्ताला दुजोला दिला असला तरी चर्चेचा अधिक तपशील सांगितलेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत शोएब अख्तर आपल्याला एका नवीन भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. हो, हे खरं आहे. पाक क्रिकेट बोर्डाने मला निवड समिती प्रमुख पदावर काम करण्याबद्दल विचारलं आहे. याबाबत माझी पाक क्रिकेट बोर्डातील काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून मला ही नवीन जबाबदारी घ्यायला आवडेल. परंतू अद्याप काही गोष्टींवर चर्चा सुरु आहे, त्यामुळे अंतिम निर्णय झालेला नाही, असे अख्तरने म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत