बंगळूरुच्या मुख्य प्रशिक्षकांचा राजीनामा
क्रीडा

बंगळूरुच्या मुख्य प्रशिक्षकांचा राजीनामा

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू सायमन कॅटिचने आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. त्याशिवाय आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळूरुने श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा, दुश्मंता चमीरा आणि ऑस्ट्रेलियाचा टिम डेव्हिड यांना करारबद्ध केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

४६ वर्षीय कॅटिच गेल्या यांनी वैयक्तिक कारणास्तव प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अ‍ॅडम झम्पा, डॅनिएल सॅम्स आणि फिन अ‍ॅलन उर्वरित आयपीएलमध्ये सहभागी होणार नाहीत.