मोठी बातमी : माजी कर्णधार सौरव गांगुलीला हृदयाविकाराचा झटका
क्रीडा

मोठी बातमी : माजी कर्णधार सौरव गांगुलीला हृदयाविकाराचा झटका

कोलकाता : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करून झाल्यावर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावर आज सांयकाळी अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया होणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सौरवला सौम्य कार्डियक अरेस्ट झटका बसला आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला शुक्रवारी (१ जानेवारी) छातीत दुखू लागले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृतीत सुधारणा होत असून डॉक्टरांचे पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. गांगुलीच्या प्रकृतीसंदर्भात अद्याप अपडेट आले नाहीत.