श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाची वाढली चिंता
क्रीडा

श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाची वाढली चिंता

नवी दिल्ली : भारताविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेपूर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर यांना कोरोनाची लागण झाली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याबाबत माहिती दिली. आरटी-पीसीआर चाचणीत फ्लॉवर पॉझिटिव्ह आढळले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१३ जुलैपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू होईल. करोनाची लक्षणे आढळल्यानंतर फ्लॉवर यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांना लगेचच इंग्लंडहून परतलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षकांपासून वेगळे ठेवण्यात आले, जे सध्या क्वारंटाइन कालावधी पूर्ण करत आहेत, असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ एकदिवसीय सामने १३, १६ आणि १८ जुलै रोजी खेळले जातील. यानंतर दोन्ही संघ २१, २३ आणि २५ जुलै रोजी टी-२० सामने खेळतील. सर्व सामने कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियमवर होतील.

श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघ :
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यजुर्वेद्र चहल, राहुल चहर, के गौतम, कुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उप-कर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.