कोहलीपाठोपाठ आणखी एक क्रिकेटपटू बनला बाप
क्रीडा

कोहलीपाठोपाठ आणखी एक क्रिकेटपटू बनला बाप

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या घरी काही दिवसांपूर्वीच चिमुकलीचे आगमन झाले. विराट-अनुष्का यांनी सोमवारी त्या मुलीचं बारसं करून तिचं नाव वमिका असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर विराटपाठोपाठ आणखी एक स्टार खेळाडू बाबा झाल्याची गोड बातमी क्रिकेट चाहत्यांना मिळाली. वेस्ट इंडिजचा अनुभवी फिरकीपटू सुनील नरेनला पुत्ररत्न प्राप्ती झाली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सुनील नरेनने नविन पाहुण्याच्या आगमनाची माहितीदेखील इन्टाग्रामवरून दिली होती. २१ ऑक्टोबर २०२०रोजी त्याने त्याच्या पत्नीसोबत फोटो पोस्ट केला होता. त्याच्या हातात एक छोटीशी जर्सी होती. त्यावेळी त्याने पत्नी गरोदर असल्याचं सांगितलं होतं.

त्यानंतर सुनील नरेनने सोमवारी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून साऱ्यांना ही गोड बातमी दिली. त्याची पत्नी अँजेलिना हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सुनील नरेनने इंस्टाग्राम अकाउंटवर त्या मुलाचा फोटो पोस्ट केला आणि नव्या पाहुण्यासाठी फोटोला छान कॅप्शन लिहिले. तू आमच्या हृदयातील अशी जागा भरून काढली आहेस ज्या पोकळीची आम्हाला जाणीवही नव्हती. तुझ्या इवलाश्या चेहऱ्यावर आम्हाला देवाची कृपा आणि दया दिसते आहे. तुला आमचं खूप खूप प्रेम मिळो, असं कॅप्शन त्याने लिहिलं आहे.