आयपीएलवर पुन्हा कोरोनाचे संकट! एकाला लागण; सहा जणांचे विलगीकरण
क्रीडा

आयपीएलवर पुन्हा कोरोनाचे संकट! एकाला लागण; सहा जणांचे विलगीकरण

दुबई : आयपीएलवर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट निर्माण झालं आहे. सनरायजर्स हैद्राबादचा गोलंदाज टी नटराजनला कोरोनाची लागण झाल्याने सहा जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. टी नटराजनसोबत हैद्राबादचा आणखी एक खेळाडू विजय शंकर आणि पाच सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यामध्ये टीम मॅनेजर विडय कुमार, फिजिओथेरपिस्ट श्याम सुंदर जे, डॉक्टर अंजना वन्नन, लॉजिस्टिक मॅनेजर तुषार खेडकर, नेट गोलंदाज पेरियासॅमी गणेशन यांचा समावेश आहे. हे सर्वजण टी-नटराजनच्या संपर्कात आले होते अशी माहिती देण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आरटीपीसीआर चाचणी केली असता टी नटराजनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आयपीएलकडून देण्यात आली आहे. टी नटराजनला कोरोनाची कोणतीही लक्षणं जाणवत नसून सध्या इतर सहकाऱ्यांपासून अंतर ठेवत विलगीकरणात आहे. सनरायजर्स हैद्राबादचा आज दिल्ली कॅपिटल्ससोबत सामना होणार आहे. कोरोनामुळे आयपीएल स्थगित केल्यानंतर पुन्हा एकदा दुबईत खेळलं जात असून हैद्राबादचा हा पहिलाचा सामना आहे.

दरम्यान आयपीएलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजता जवळच्या संपर्कातील आणि इतरांची आरटीपीसीआर टेस्ट केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामुळे आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैद्राबादमध्ये होणारा सामना ठरल्याप्रमाणे पार पडेल.