भुवीला मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार न मिळाल्याने कोहलीला आश्चर्याचा धक्का
क्रीडा

भुवीला मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार न मिळाल्याने कोहलीला आश्चर्याचा धक्का

पुणे : पुण्यात झालेल्या तीन एकदिलसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. शेवटपर्यंत रंगलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सॅम करनने जिद्दीने खेळी करत विजय खेचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आलं नाही. दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. विशेषतः शार्दुर ठाकूरने केलेल्या गोलंदाजीबरोबरच फलंदाजीही केली. त्यामुळे शार्दुलला मॅन द मॅच आणि भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ द सिरीज मिळण्याची शक्यता होती. मात्र, सॅम करनला मॅन ऑफ द मॅच आणि जॉनी बेअरस्टोला मॅन ऑफ द सिरीज मिळाल्याने कर्णधार विराट कोहलीनं आश्चर्य व्यक्त केलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंग्लंडकडून खेळताना सॅम करनने नाबाद ९५ धावांची खेळी केली. त्यामुळे सॅम करनला मॅन ऑफ द मॅच आणि तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत २१९ धावा करणाऱ्या जॉनी बेअरस्टोला मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार देण्यात आला. सामना संपल्यानंतर यावर बोलताना कर्णधार विराट कोहलीनं यावर आश्चर्य व्यक्त केलं.

शार्दुल ठाकूरला मॅन ऑफ द मॅच आणि भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ द सीरिजसाठी निवड करण्यात आली नाही, याचं मला आश्चर्य वाटत आहे. अनुकूल परिस्थिती नसतानाही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, असं कोहली म्हणाला.