दुसऱ्या सामन्यानंतर भारतीय संघाला ठोठावला दंड! जाणून घ्या कारण
क्रीडा

दुसऱ्या सामन्यानंतर भारतीय संघाला ठोठावला दंड! जाणून घ्या कारण

अहमदाबाद : भारतिय संघाला दुसऱ्या टी-२० सामन्यात दंड बसला आहे. भारतीय संघातल्या प्रत्येक खेळाडूला मॅच फीच्या २० टक्के रक्कम दंड ठोठावण्यात आला आहे. १४ मार्च रोजी झालेल्या सामन्यामध्ये भारतानं इंग्लंडला ७ विकेट्सने धूळ चारत सामना खिशात घातला आणि मालिकेमध्ये १-१ अशी बरोबरी साधली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र, या सामन्यात विजय मिळवल्यानंतर सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी टीम इंडियाला सामन्याच्या मानधनाच्या २० टक्के रक्कम दंड ठोठावला. सामन्यात ठरवून दिलेल्या वेळेमध्ये १ ओव्हर कमी टाकल्यामुळे ओव्हर्सचा वेग योग्य तो राखू न शकल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला. आयसीसीच्या नियमावलीनुसार ओव्हर्सचा वेग मंद राखल्यास प्रत्येक कमी पडलेल्या ओव्हरमागे सामन्याच्या २० टक्के रक्कम दंड ठोठावला जातो.

अशी होते सुनावणी
अशा वेळी मैदानावरील दोन अंपायर आणि थर्ड अंपायर असे तिघे मिळून संबंधित संघाने ओव्हर्सचा वेग मंद राखल्याचा दावा करतात. यानंतर सामनाधिकाऱ्यांसमोर याबाबतची सुनावणी होते. त्यानंतर दोषी आढळल्यास दंड ठोठावला जातो. मात्र, या प्रकरणात विराट कोहलीने हा दावा मान्य केल्यामुळे रीतसर सुनावणी न घेता दंड ठोठावण्याचा पर्याय निवडण्यात आला.