क्रीडा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. १८ ते २२जून दरम्यान हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी १५सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या सामन्यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे, तर उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आले आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांना संधी मिळाली आहे, तर के एल राहुल आणि मयंक अगरवाल यांना वगळण्यात आले आहे. मधल्या फळीत कोहली आणि रहाणे व्यतिरिक्त चेतेश्वर पुजाराचा समावेश आहे. हनुमा विहारीलाही संधी मिळाली आहे.

यष्टीरक्षक म्हणून संघात ऋषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांना स्थान मिळाले आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांना वगळण्यात आले असून मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार कामगिरी केलेल्या हैद्राबादच्या मोहम्मद सिराजलाही स्थान देण्यात आले आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडने या सामन्यासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असलेल्या २० लोकांच्या संघातून पाच खेळाडूंना वगळण्यात आले आहे.

भारतीय संघ-
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान सहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड संघ –
केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कॉन्वे,कॉलिन डी ग्रॅन्डहोमे, मॅट हेनरी, काइल जेमिसन, टॉम लाथम, हेनरी निकोलस, एजाज पटेल, टीम साउदी, रॉस टेलर, नील वॅग्नर, बीजे वॉटलिंग, विल यंग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *