भारताला U-19 विश्वकरंडक जिंकून देण्याऱ्या कर्णधाराची क्रिकेटमधून निवृत्ती
क्रीडा

भारताला U-19 विश्वकरंडक जिंकून देण्याऱ्या कर्णधाराची क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : भारताचा १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार उन्मुक्त चंदने शुक्रवारी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. उन्मुक्त चंदने ट्विटर, इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उन्मुक्त चंदने म्हटले, ‘क्रिकेट हा एक सार्वत्रिक खेळ आहे आणि अर्थ बदलू शकतो, पण उद्देश नेहमी सारखाच राहतो आणि तो म्हणजे उच्च स्तरावर खेळणे. तसेच माझ्या सर्व समर्थक आणि चाहत्यांचे आभार, ज्यांनी मला नेहमी माझ्या हृदयात स्थान दिले आहे. २०१२चा १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकल्यानंतर तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. त्यानंतर त्याने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १११ धावांची नाबाद खेळी केली आणि भारताला विश्वचषक जिंकून दिला.

माध्यमांच्या वृत्तानुसार, उन्मुक्त आता अमेरिकाकडून खेळण्याची शक्यता आहे. उन्मुक्त चंद अमेरिकेसाठी खेळत असल्याच्या बातम्या पहिल्यांदा मे २०२१मध्ये समोर आल्या. तेव्हा एका पाकिस्तानी खेळाडूने म्हटले होते की, अनेक भारतीय क्रिकेटपटू अमेरिकेत खेळण्याची तयारी करत आहेत. हा पाकिस्तानी खेळाडू सध्या अमेरिकेकडूनही खेळतो आणि त्याचे नाव सामी अस्लम आहे.