विजय हजारे ट्रॉफीमध्ये पृथ्वी शॉचा दबदबा; ७९ चेंडूत ठोकलं शतक
क्रीडा

विजय हजारे ट्रॉफीमध्ये पृथ्वी शॉचा दबदबा; ७९ चेंडूत ठोकलं शतक

मुंबई : कर्नाटकविरोधातील उपांत्य फेरीच्या सामम्यात पृथ्वी शॉने तुफान फटकेबाजी करत फक्त ७९ चेंडूत शतक झळकावलं आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये पृथ्वी शॉचे हे सलग दुसरं शतक आहे. तसेच, एका सिझनमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मयांक अग्रवलाचा रेकॉर्डही त्याने तोडला आहे. मयांकने विजय हजारे ट्रॉफी २०१७-१८ च्या हंगामात ७२३ धावा केल्या होत्या. मयांक अग्रवालचा रेकॉर्ड तोडताना पृथ्वी शॉने चार शतकं ठोकली आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कर्नाटकविरोधातील उपांत्य फेरीच्या सामन्यात पृथ्वीने ७९ चेंडूत शतक पूर्ण करताना त्याने एकूण १२ चौकार आणि तीन षटकार ठोकले. १६५ धावांवर तो बाद झाला. १२२ चेंडूंमध्ये १६५ धावा करताना त्याने एकूण १७ चौकार आणि सात षटकार ठोकले. श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत पृथ्वी शॉ मुंबई संघाचं नेतृत्वदेखील करत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पृथ्वी शॉ भारतीय संघात होता. पण खराब फलंदाजीमुळे पहिल्या कसोटी सामन्यानंतर त्याला वगळण्यात आलं. इंग्लंडविरोधातील कसोटी सामन्यातही पृथ्वी शॉला संधी मिळाली नाही. यादरम्यान स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईसाठी पृथ्वी शॉ चांगली कामगिरी करताना दिसत आहे.

याआधीच्या सौराष्ट्रविरोधातील सामन्यात पृथ्वीने १८५ नाबाद धावा करत मुंबईला नऊ गडी राखून विजय मिळवून दिला. फक्त १२३ चेंडूत त्याने १८५ धावा केल्या. पृथ्वीने केलेल्या झुंजार खेळीमुळे मुंबईने २८६ धावांचं आव्हान ४२ ओव्हर्समध्येच पूर्ण केलं.