विनू मांकड, कुमार संगकारा यांना आयसीसीच्या ‘या’ यादीत मिळाले स्थान
क्रीडा

विनू मांकड, कुमार संगकारा यांना आयसीसीच्या ‘या’ यादीत मिळाले स्थान

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा महान खेळाडू विनू मांकड, श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारा आणि झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवर यांच्यासह दहा दिग्गजांना आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल विनू मांकड यांना आयसीसीने सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान दिले आहे. मांकडने ४४ कसोटी सामने खेळले असून यात मांकडने ३१.४७ च्या सरासरीने २ हजार १०९ धावा केल्या. तर ४४ कसोटी सामन्यांमध्ये ३२.३२च्या सरासरीने १६२ बळी घेतले. मांकडची गणना भारताच्या महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते.

श्रीलंकेकडून संगकाराने १४४ कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये त्याने ५७.४० च्या सरासरीने १२,४०० धावा केल्या. या मध्ये त्याने ३८ शतके आणि ५२ अर्धशतके केली आहेत. याशिवाय त्याने १८२ कॅच घेतले आणि २० स्टंपिंग्स केले. संगकाराच्या नेतृत्वात श्रीलंकेने २०११ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता, जरी त्या संघाला भारताकडून पराभवाला सामोरे जावे लागले. संगकारा एक उत्तम फलंदाज तसेच एक महान यष्टीरक्षक होता.