तर विराट कोहलीची होणार कर्णधारपदापरून हकालपट्टी
क्रीडा

तर विराट कोहलीची होणार कर्णधारपदापरून हकालपट्टी

नवी दिल्ली : जर भारतीय संघ यावर्षी होणारा टी-२० वर्ल्डकप जिंकण्यात अपयशी ठरला, तर विराट कोहलीचे मर्यादित षटकांचे कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते आणि ही जबाबदारी सलामीचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माकडे सोपवली जाऊ शकते, असे वृत्त समोर आले आहे. विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी झाला आहे, पण संघ त्याच्या नेतृत्वाखाली मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

Cricketaddictor.com मधील एका अहवालानुसार, टीम इंडियाचा कर्णधार विराट आगामी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल. कर्णधारपदावरून याआधीही तो अनेकवेळा चर्चेत आला आहे. विशेषत: एक मजबूत संघ असूनही आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयश आल्यानंतर विराट आपले कर्णधारपद गमावू शकतो.

वेबसाईटने म्हटले आहे की, इंग्लंडमधील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाल्यापासून बीसीसीआयचे अधिकारी या विषयावर चर्चा करत आहेत. हे अधिकारी भारतीय कर्णधाराच्या संघ निवडीवर नाखूष होते. या सामन्यात कोहलीने वेगवान गोलंदाजांना अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर दोन फिरकीपटू खेळवले. अहवालानुसार, बीसीसीआय कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल खूप चिंतित आहे, विशेषत: आयसीसी स्पर्धांमध्ये तो आयसीसी स्पर्धांमध्ये कर्णधार म्हणून अपयशी ठरला आहे. डब्ल्यूटीसी फायनलनंतर जुलैमध्ये बीसीसीआय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत असे दिसून आले, की बीसीसीआयचे अनेक अधिकारी कोहलीच्या कर्णधारपदावर समाधानी नाहीत.

या बैठकीला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह आणि कोषाध्यक्ष अरुण धुमाळ उपस्थित होते. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये दोन फिरकीपटूंसोबत पुढे जाण्याचा निर्णय बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी फारसा आवडला नाही आणि म्हणूनच टी-२० वर्ल्डकप कोहलीची शेवटची संधी असू शकते.