धोनीकडून विराटचे दोन शब्दांत वर्णन; जिंकली नेटीझन्सची मने
क्रीडा

धोनीकडून विराटचे दोन शब्दांत वर्णन; जिंकली नेटीझन्सची मने

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला इंस्टाग्रामवर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशी असलेले आपले संबंध दोन शब्दांत सांगण्यासाठी एक प्रश्न विचारण्यात आला. यावर विराटने भन्नाट उत्तर देत नेटीझन्सनची मने जिंकली आहेत. विश्वास आणि आदर असे शब्द विराटने धोनीविषयी वापरले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विराटने धोनीचे कौतुक करण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी रवीचंद्रन अश्विनबरोबर इन्स्टाग्राम संवादादरम्यान कोहलीने धोनीचे कौतुक केले होते. राष्ट्रीय संघाचा कर्णधार होण्यात माहीची मोठी भूमिका होती, असे विराटने म्हटले होते. २०१४मध्ये धोनीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अचानक कसोटी निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर कोहलीला कर्णधार बनवण्यात आले.

विराट कोहली आणि धोनी या दोघांनीही ६० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. कोहलीने त्याच्या नेतृत्वात ३६ सामने जिंकले आहेत, तर धोनीच्या नेतृत्वात संघाने २७ सामने जिंकले आहेत. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा विचार केला, तर धोनी पुढे आहे. धोनीने आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जचा तीन विजेतेपदे मिळवून दिली आहेत. याशिवाय त्यांनी चॅम्पियन्स लीग टी-२०चे विजेतेपदही जिंकले आहे. धोनी हा भारताकडून सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार आहे. त्याने ३३२ सामन्यांचे नेतृत्व केले. यापैकी त्याने १७८ सामन्यात विजय मिळवला आहे. विराटने २०० सामन्यांमध्ये कर्णधारपद सांभाळले आहे. यात त्याला १२८ सामन्यात विजय मिळवता आला आहे.