द ग्रेट विराट कोहली; शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
क्रीडा

द ग्रेट विराट कोहली; शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

नवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विजडन अलमॅनाकने २०१० ते २०२० या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून त्याची निवड केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कपिल देवचाही सन्मान करताना सचिनला ९०च्या दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, तर कपिल देवचा ८० दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांना ५० वर्षे पूर्ण झाल्याने दशकातील पाच एकदिवसीय क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली आहे. १९७१ ते २०२१ या कालावधीतील पाच क्रिकेटपटूंना हा मान देण्यात आला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली २०११च्या विश्वचषक विजेता संघाचा सदस्य असलेल्या विराटने दहा वर्षात ११ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. त्यात ४२ शतकांचा समावेश आहे.

९०च्या दशकात केलेल्या कामगिरीसाठी सचिनची निवड करण्यात आली आहे. सचिनने १९९८मध्ये ९ शतकं झळकावली होती. तर कपिल देवला ८० च्या दशकातील कामगिरीसाठी मान देण्यात आला आहे. कपिल देवच्या नेतृत्वाखालील संघाने १९८३ साली भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. या दशकात कपिलने सर्वाधिक गडी बाद केले होते. सर्वाधिक स्ट्राइक रेटने १ हजाराहून अधिक धावा केल्या होत्या.

त्याचबरोबर, इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सची सलग दूसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट क्रिकेटर म्हणून निवड केली आहे. ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी हिला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर म्हणून गौरविण्यात आलं आहे. तर वेस्टइंडीजच्या कॅरॉन पोलार्डला सर्वोत्कृष्ट टी २० क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आलेलं आहे.