विराटची तुफान कामगिरी; सचिनच्या विक्रमाशी बरोबरी तर कॅलिसला धोबीपछाड
क्रीडा

विराटची तुफान कामगिरी; सचिनच्या विक्रमाशी बरोबरी तर कॅलिसला धोबीपछाड

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडला 66 धावांनी मात दिली. विराट कोहलीने अर्धशतक ठोकत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. विराटने आपले 61वे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. विराट आता सचिन तेंडुलकरनंतर घरच्या मैदानावर 10,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटने आपल्या 176व्या सामन्यात हा पराक्रम केला असून कोणत्याही फलंदाजाची आतापर्यंतची ही वेगवान कामगिरी आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोहलीने आतापर्यंत 432 सामन्यात 55च्या सरासरीने 22689 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. तर सचिन तेंडुलकर यात आघाडीवर आहे. सचिनने कारकीर्दीत 48च्या सरासरीने 664 सामन्यांत 34357 धावा केल्या आहेत.

अर्धशतकी खेळी करताना विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिसलाही मागे टाकले आहे. विराटने एकूण 104 एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावली आहेत, तर कॅलिसने 103 वेळा अशी कामगिरी केली आहे.