क्रीडा

ये नया इंडिया है, घर मै घुसकर मारता है; ट्वीट करत वीरेंद्र सेहवागने केले टीम इंडियाचे कौतुक

नवी दिल्ली : खूशी के मारे पागल. ये नया इंडिया है. घर मै घुसकर मारता है. अॅडलेड कसोटीनंतर ते आज भारताच्या युवा खेळाडूंनी सर्वांना आनंद दिलाय. आपण विश्वचषक याआधी जिंकलाय, पण आजचा विजय खूप महत्वाचाय आणि हो, पंतमुळे हा विजय जास्त महत्वाचा ठरलाय”, असं ट्विट करत वीरेंद्र सेहवागनं भारताच्या या ऐतिहासिक विजयाचं माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं त्याच्या हटके शैलीत टीम इंडियाचं अभिनंदन केलंय. “विशेष म्हणजे, हे ट्विट करताना सेहवागनं एका ट्रकचा फोटो ट्विट केलाय. या ट्रकच्या मागच्या बाजूस “ये नया भारत है, घर में घुसकर मारता है” , असं लिहिलंय. त्यामुळे सेहवागचं हे ट्विट तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अजिंक्य विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला.विशेष म्हणजे भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. त्यामुळे क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेनमध्ये सुरु असलेल्या चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात पाहायला मिळालं.

तर वीरेंद्र सेहवाग नंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने देखील भारतीय संघाच कौतुक केलं आहे. “प्रत्येक सेशनमध्ये आपल्याला नवा हिरो पाहायला मिळालाय. जेव्हा आपल्याला दुखापतींना सामोरं जावं लागलं. तेव्हा आपण आणखी खंबीरपणे उभं राहिलो. स्वत:च्या सीमांना ओलांडून निष्काळजीपणे नव्हे, तर निर्भयतेने क्रिकेट खेळलो. दुखापती आणि अनिश्चिततेचा सामना अतिशय संयम व आत्मविश्वासाने केला. आतापर्यंतच्या सर्वात उत्कृष्ट मालिका विजयांपैकी हा एक विजय आहे. भारतीय संघाचे अभिनंदन”, असं सचिन तेंडूलकरने ट्वीट मध्ये म्हंटले आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघानं शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचं कठीण आव्हान पार केलं आहे. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि झटपट धावा काढणाऱ्या ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतानं चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासाह भारतानं बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ नं जिंकली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *