उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा; हे हुकुमी एक्के परतले संघात
क्रीडा

उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा; हे हुकुमी एक्के परतले संघात

मेलबर्न : बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसल्यानंतर उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसह ऑस्ट्रेलियाचे हुकुमी एक्के संघात परतले आहेत. मालिकेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने डेव्हिड वॉर्नर, सिन अबॉट आणि नवोदीत पुकोव्सकी यांना संघात स्थान दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मेलबर्न कसोटी पराभवानंतर माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू रिकी पाँटींगने आपली नाराजी व्यक्त केली होती. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजासमोर खराब प्रदर्शन केलं. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या हातून सामना गेला होता. पहिल्या कसोटीत ३६ धावांवर बाद होणाऱ्या भारतीय संघानं दुसऱ्या कसोटी सामन्यात जोरदार मुसंडी मारल्याचे पाँटिंग म्हणाला होता.

उर्वरित सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघ
टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उप-कर्णधार), सिन अबॉट, कॅमरुन ग्रीन, नॅथन लियॉन, मायकेल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्सकी, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपन्सन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, जोश हेजलवूड, मार्कस हॅरीस, ट्रॅविस हेड, मोईजस हेन्रिकेज, मार्नस लाबुशेन