ऑलिम्पिकमध्ये उघडलं भारताचं खातं; मीराबाई चानूनं जिंकलं रौप्यपदक
क्रीडा

ऑलिम्पिकमध्ये उघडलं भारताचं खातं; मीराबाई चानूनं जिंकलं रौप्यपदक

TOKYO 2020 : भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मीराबाईने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे पहिले पदक जिंकणार्‍या मीराबाई चानूचे ट्विटरवरून अभिनंदन केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. कर्णम मल्लेश्वरीने हे पदक भारताला मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे.

पहिल्या प्रयत्नात मीराबाईने ८४ किलो आणि दुसर्‍या प्रयत्नात ८७ किलो वजन उचलले. मात्र तिसऱ्या प्रयत्नात ती ८९ किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली. स्नॅच फेरीत तिने दुसरे स्थान पटकावले. ९४ किलो वजनासह चिनी वेटलिफ्टर हौ झीहूने पहिले स्थान मिळवले. यानंतर मीराबाई चानूने आपल्या क्लीन अँड जर्कच्या दुसऱ्या प्रयत्नात ११५ किलो वजन उचलून एक नवीन ऑलिम्पिक विक्रम केला, परंतु चीनच्या हौ झीहूने पुढच्या प्रयत्नात ११६ किलो वजन उचलले. त्यानंतर चानूला झीहूच्या पुढे जाण्यासाठी ११७ किलो वजन उचलण्याची गरज होती, पण ती त्यात अयशस्वी झाली.