महिला आयपीएलला केव्हा होणार सुरुवात? आणि कधी रंगणार फायनल, जाणून घ्या
क्रीडा

महिला आयपीएलला केव्हा होणार सुरुवात? आणि कधी रंगणार फायनल, जाणून घ्या

महिलांची आयपीएल नेमकी कधी सुरु होणार आणि फायनलचा सामना कधी रंगणार हे आता समोर आले आहे. महिला आयपीएलच्या लिलावासाठी बीसीसीआयला हॉटेल मिळत नसल्यामुळे ते ट्रोल झाले होते. पण आता हा लिलाव कधी होणार आणि आयपीएलचे सामने कधी होणार या गोष्टी आता समोर आल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महिलांच्या आयपीएलला ४ मार्चला सुरुवात होणार आहे. हा सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. आयपीएलमध्ये पाच संघांमध्ये २२ सामने खेळवण्यात येणार आहे. पण या आयपीएलमध्ये दोन दिवस ब्रेक असणार आहे. १७ आणि १९ मार्च या दिवशी महिला आयपीएलचे सामने होणार नाहीत. त्याचबरोबर २२ मार्चला आयपीएलची साखळी फेरी संपणार आहे. त्यानंतर २४ मार्चला आयपीएलमध्ये एलिमिनेटरचा सामना सुरु होणार आहे. त्यानंतर २६ मार्चला महिलांच्या आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर होणार आहे.

आयपीएलचे सामना यावेळी जास्तकरून मुंबई आणि नवी मुंबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. मुंबईमध्ये ब्रबॉर्न स्टेडियमवर हे सामने होतील, पण वानखेडे स्टेडियममध्ये मात्र हे सामने होणार नसल्यचाे म्हटले जात आहे.