क्रीडा

धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मुलगी झिवाने पोस्ट केला गोड व्हिडीओ.. नक्की पहा..

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आज त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. धोनीला त्याच्या वाढदिवसाबद्दल सोशल मिडायामधून असंख्य चाहते शुभेच्छा देत आहेत. त्यासोबतच धोनीची मुलगी झिवाने देखील धोनीली वाढदिवसाच्या विषेश शुभेच्छा दिल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

झिवाने वडिलांसाठी गाण्याचा व्हिडीओ पोस्ट करत वाढदिवसाचे गीफ्ट गोड दिले आहे. ज्यामध्ये झिवा गाणे गात आहे. सोबतच तीचे लहानपणापासूनचे फोटो व्हिडीओमध्ये झिवाच्या बालपणापासूनचा टाकण्यात आले आहेत. हा व्हिडीओ झिवाच्या अधिकृत अकांउटवर पोस्ट करण्यात आला असून सोशल मिडीयावर तो चांगलाच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

This is for my Papa ! @mahi7781 I love you ❤️

A post shared by ZIVA SINGH DHONI (@ziva_singh_dhoni) on

याआधी देखील महेंद्र सिंह धोनी आणि झिवा यांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियीवर व्हायरल झाले आहेत. त्या दोघांच्या व्हिडीओला सोशल मिडीयावर चांगलीच प्रसिध्दी मीळते. आयपीएल सामन्यादरम्यान देखील धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा या स्टेडीयममध्ये हजर राहतात.
मागच्या वर्षी झालेल्या विश्वचषकानंतर धोनीने भारतासाठी एकही अंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाहीये. 2019 च्या विश्वचषकादरम्यान सेमिफायनल सामन्यात न्यूझीलंड संघाकडून परभव स्विकारवा लागला होता. त्यानंतर जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस महामारीमुळे आयपीएल स्थगीत झाल्याने धोनी मैदाणावर परतू शकलेला नाहीये.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत