शेवटच्या क्षणी न्यूझीलंड संघाची पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेतून माघार
क्रीडा

शेवटच्या क्षणी न्यूझीलंड संघाची पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेतून माघार

कराची : पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेवर विश्वास नसल्याने शेवटच्या क्षणी न्यूझीलंडने संघाने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघ तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानात क्रिकेट सामने खेळणार होता. मात्र सुरक्षेचं कारण देत न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दौरा स्थगित केल्यानं पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात तीन एकदिवसीय आणि पाच टी २० सामन्यांची मालिका खेळली जाणार […]

ऑस्ट्रेलियाला विरुद्धच्या सामन्यातील पराभवावर विराट कोहली म्हणाला; आमचा एकतर्फी …
क्रीडा

विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार; ट्वीटरवरून केलं जाहीर!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आपल्या ट्वीटर हँडलवर विराटनं एक पत्रच ट्वीट केलं असून त्यामध्ये आपल्या निर्णयाविषयी त्यानं सविस्तर लिहिलं आहे. दरम्यान, आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेनंतर आपण कर्णधारपद सोडणार असल्याचं विराटनं या पत्रात म्हटलं आहे. आपल्या पत्रामध्ये विराट कोहलीनं त्याला पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचे […]

आयपीएलमध्ये दिसणार दहा संघ; नव्या संघासाठी निघालं टेंडर
क्रीडा

नव्या आयपीएल संघांचा लिलाव होणार ‘या’ तारखेला

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये पुढील हंगामापासून दोन नवे संघ समाविष्ट केले जाणार आहेत. बीसीसीआय दोन नवीन संघांचा लिलाव १७ ऑक्टोबर रोजी करणार असून हे संघ खरेदी करण्यासाठी ५ ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातून होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. आयपीएल प्रशासकीय समितीने ३१ ऑगस्ट रोजी दोन नव्या संघांच्या खरेदीसाठी […]

IPL 2021 : मुंबईने मलिंगाला केला बाय-बाय; हे खेळाडू ठेवले कायम
क्रीडा

लसिथ मलिंगानं जाहीर केली निवृत्ती; आता दिसणार या भूमिकेत!

कोलंबो : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने क्रिकेटला निरोप दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आधीच अलविदा म्हणणारा मलिंगा आता लीग क्रिकेट खेळणार नाही. मलिंगाने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. मलिंगाने म्हटले, मी आता क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटला निरोप देत आहे. ज्यांनी माझ्या प्रवासात मला साथ दिली त्यांचे आभार. आता मी येत्या काही वर्षांमध्ये माझे अनुभव युवा […]

ऑस्ट्रेलियाला विरुद्धच्या सामन्यातील पराभवावर विराट कोहली म्हणाला; आमचा एकतर्फी …
क्रीडा

तर विराट कोहलीची होणार कर्णधारपदापरून हकालपट्टी

नवी दिल्ली : जर भारतीय संघ यावर्षी होणारा टी-२० वर्ल्डकप जिंकण्यात अपयशी ठरला, तर विराट कोहलीचे मर्यादित षटकांचे कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते आणि ही जबाबदारी सलामीचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माकडे सोपवली जाऊ शकते, असे वृत्त समोर आले आहे. विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी झाला आहे, पण संघ त्याच्या नेतृत्वाखाली मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धा जिंकण्यात […]

भारताला मोठा झटका; हा खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, इंग्लंडविरुद्धही साशंकता
क्रीडा

३ कसोटी, ३ वनडे आणि ४ टी-२०..! भारताचा आफ्रिका दौरा; असे आहे वेळापत्रक

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ वर्षअखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. हा दौरा १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ४१ दिवसांच्या दौऱ्यात भारतीय संघ ३ कसोटी सामने, ३ एकदिवसीय सामने आणि ४ टी-२० सामने खेळणार आहे. भारताचा दौरा २६ जानेवारीला शेवटच्या टी-२० सामन्याने संपेल. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी भारत दौऱ्याची घोषणा केली. भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध […]

बीसीसीआयने बंदी घातलेल्या क्रिकेटपटूलाच निवड समीतीकडून संधी
क्रीडा

टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषण करण्यात आली आहे. पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर यांना यामधून वगळण्यात आले आहे. सलामीवीर शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांनाही अनपेक्षित डच्चू मिळाला आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या १५ सदस्यीय संघात अनुभवी रविचंद्रन अश्विनसह पंचतारांकित फिरकी माऱ्याची रचना […]

तालिबानला ऑस्ट्रेलिया क्रिकेटचं जोरदार उत्तर; महिला नाही तर…!
क्रीडा

तालिबानला ऑस्ट्रेलिया क्रिकेटचं जोरदार उत्तर; महिला नाही तर…!

काबूल : अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यानंतर तालिबानने महिला खेळाडूंवर बंदी घालण्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या निर्णयाचा विरोध केला असून अफगाणिस्तानात महिला क्रिकेटला समर्थन दिलं नाही तर पुरुष क्रिकेट संघासोबत होणारा प्रस्तावित सामना खेळणार नाही असा इशारा दिला आहे. तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे उपप्रमुख अहमदुल्लाह वासिक यांनी अफगाणिस्तानमधील महिलांना क्रिकेट सहित अन्य खेळांमध्ये भाग घेता […]

वा शार्दूल व्वा! ठोकलं सलग दुसरं अर्धशतक
क्रीडा

वा शार्दूल व्वा! ठोकलं सलग दुसरं अर्धशतक

ओव्हल : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या सामन्यात चौथ्या दिवसी सलामीवीर रोहित शर्माची शतकी खेळी आणि त्याला चेतेश्वर पुजाराची लाभलेली साथ इंग्लंडसमोर दमदार आव्हान देण्यात भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरली. या दोघांनंतर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी चौथ्या दिवशी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. तासाभरात ख्रिस वोक्सने जडेजा (१७) आणि त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेला पायचित पकडले. रहाणेला […]

रोहित-पुजाराच्या भागीदारीमुळे भारताची सामन्यात आघाडी
क्रीडा

रोहित-पुजाराच्या भागीदारीमुळे भारताची सामन्यात आघाडी

ओव्हल : सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी केलेल्या भागीदारीच्या जीवावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. रोहितने (२५६ चेंडूंत १२७ धावा) साकारलेल्या शतकाला चेतेश्वर पुजाराच्या (१२७ चेंडूंत ६१ धावा) अर्धशतकाची बहुमूल्य साथ लाभली. त्यामुळे भारताकडे आता चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर १७१ धावांची आघाडी झाली आहे. तिसऱ्या दिवशी अंधूक […]