अखेरच्या सामन्यात पाकिस्तानची बाजी; टाळला व्हाईटवॉश
क्रीडा

अखेरच्या सामन्यात पाकिस्तानची बाजी; टाळला व्हाईटवॉश

नेपियर : न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली असून व्हाईटवॉश नामुष्की टाळली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं १७४ धावांचं आव्हान पाकिस्तानने मोहम्मद रिझवानच्या अर्धशतकाच्या जोरावर पूर्ण केलं. अखेरचा सामना गमावला असला तरीही न्यूझीलंडने मालिकेत २-१ने बाजी मारली आहे. तिन्ही सामन्यांत आक्रमक खेळी करणाऱ्या टीम सेफर्टला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. पाकिस्तान संघाने यजमान न्यूझीलंडवर ४ गडी […]

INDvsAUS : सिडनीतील तिसरा कसोटी सामना होऊ शकतो रद्द
क्रीडा

INDvsAUS : सिडनीतील तिसरा कसोटी सामना होऊ शकतो रद्द

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान सध्या कसोटी मालिका सुरु असून पहिली कसोटी ऑस्ट्रेलियांने जिंकली आहे. तर दुसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. अशात तिसरा कसोटी सामना हा सिडनीमध्ये खेळवला जाणार होता. परंतु तो आता रद्द होण्याची शक्यता आहे. कारण, सिडनीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत चालला आहे, त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया मेलबर्नमध्येच भारत […]

पठ्ठ्याने ४०व्या वर्षी चोपल्या टी-२०मध्ये ९९ धावा
क्रीडा

पठ्ठ्याने ४०व्या वर्षी चोपल्या टी-२०मध्ये ९९ धावा

न्यूझीलंडबरोबर सुरु असलेल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिज याचं शतक अवघ्या एका धावेनं हुकलं. सेडन पार्क, हॅमिल्टन येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिजनं ४० व्या वर्षी ९९ धावांच्या तुफानी खेळीमुळे सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तानचा ९ गड्यांनी पराभव केला. मात्र, या सामन्यात ४० वर्षीय मोहम्मद हाफिजचीच […]

पाकिस्तानचा धुव्वा; न्यूझीलंडने ९ गडी राखत जिंकला सामना
क्रीडा

पाकिस्तानचा धुव्वा; न्यूझीलंडने ९ गडी राखत जिंकला सामना

नवी दिल्ली : न्यूझीलंडच्या संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानच्या संघाचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. कर्णधार केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडने पाकिस्तानचा ९ गडी राखून पराभव केला आहे. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं १६४ धावांचं आव्हान न्यूझीलंडने टीम सेफर्ट आणि केन विल्यमसन यांच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर […]

INDvsAUS : तब्बव ४६ वर्षांनंतर भारतीय संघावर ओढावली ही नामुष्की
क्रीडा

INDvsAUS : तब्बव ४६ वर्षांनंतर भारतीय संघावर ओढावली ही नामुष्की

अॅडिलेड : पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघाने लाजिरवाणी कामगिरी केली आहे. ४६ वर्षानंतर स्वतःचाच नकोसा विक्रम भारतीय संघाने मोडीत काढला आहे. पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावांत संपुष्टात आली. हेजलवूड आणि कमिन्सच्या धारधार गोलंदाजीपुढे भारतीय संघातील दिग्गज एकापाठोपाठ माघारी परतले. दुसऱ्या दिवसाअखेरीस १ बाद ९ […]

INDvsAUS : अवघ्या ३६ धावांत भारताचा संघ गारद; कांगारूंना ९० धावांचे आव्हान
क्रीडा

INDvsAUS : अवघ्या ३६ धावांत भारताचा संघ गारद; कांगारूंना ९० धावांचे आव्हान

ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने खूप खराब कामगिरी केली. संपूर्ण संघ अवघ्या ३६ धावांत गारद झाला आहे. भारतीय संघातील एकाही फलंदाजाला दोनअंकी संख्या गाठता आली नाही. Josh Hazlewood was absolutely sensational today 🔥 W . . . W . . . . . . . . . 1 . . 2 . […]

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला; भारताला ५३ धावांची आघाडी
क्रीडा

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला; भारताला ५३ धावांची आघाडी

अॅडिलेड : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला असून भारतिय संघाला पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी मिळाली आहे. रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर कांगारूंना केवळ १९१ धावांत रोखण्यात भारतीय संघाला यश आले आहे. भारताकडून पहिल्या डावात रविचंद्रन आश्विनने ४, उमेश यादवने ३ जसप्रीत बुमराहने २ बळी घेतले. २४४ […]

INDvsAUS : भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपला; कांगारुच्या डावाला सुरुवात
क्रीडा

INDvsAUS : भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपला; कांगारुच्या डावाला सुरुवात

अॅडिलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय संघाला पहिल्या डावात केवळ २४४ धावांपर्यंत मजल मारता आली आहे. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर केवळ ११ धावांची भर घालून भारतीय संघाने ४ फलंदाज गमावले. पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक आणि चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांच्या खेळीमुळे भारताने […]

IndvsAus : कोहलीचं अर्धशतक, मोडला धोनीचा विक्रम
क्रीडा

IndvsAus : कोहलीचं अर्धशतक, मोडला धोनीचा विक्रम

अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले आहे. या अर्धशतकाबरोबरच कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर विराटने अजिंक्य रहाणेच्या साथीने संघाचा डाव सावरत अर्धशतक झळकवालं. कसोटी क्रिकेटमधलं विराटचं हे २३ वं अर्धशतक ठरलं. या अर्धशतकी खेळीदरम्यान विराटने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय […]

IndvsAus : पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला अन् १३ वर्षांनी भारतीय संघावर ओढावली नामुष्की
क्रीडा

IndvsAus : पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला अन् १३ वर्षांनी भारतीय संघावर ओढावली नामुष्की

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉ शून्यावर माघारी परतल्यामुळे तब्बल १३ वर्षांनी भारतीय संघावर परदेशात कसोटी क्रिकेटमध्ये नामुष्की ओढावली आहे. याआधी २००७ साली चट्टोग्राम येथे झालेल्या बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात एकही धाव न करता एक विकेट गमावली होती. पहिल्या कसोटीसाठी शुबमन गिलला संधी नाकारत पृथ्वी शॉला संधी दिली. भारतीय संघाच्या […]