भाजपला मोठा धक्का? राज्यपालांच्या बैठकीतून २४ आमदार गायब
राजकारण

भाजपला मोठा धक्का? राज्यपालांच्या बैठकीतून २४ आमदार गायब

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी नुकतीच राज्यपाल जगदीप धनखर यांची सुवेंदु अधिकारी यांच्यासोबत जाऊन भेट घेतली. मात्र या बैठकीमध्ये भाजपचे २४ आमदार अनुपस्थित असल्याने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. बंगाल विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते असणाऱ्या सुवेंदु अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी राजभवनामध्ये पक्षाच्या […]

तर भाजप ममता बॅनर्जींची हत्या करु शकते; मंत्र्याचे धक्कादायक विधान
क्रीडा

भारतीय संघाचा ‘हा’ खेळाडू ममतांच्या मंत्रीमंडळात झाला क्रीडामंत्री

कोलकाता : दिल्लीचा खासदार गौतम गंभीरप्रमाणे क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या खेळपट्टीवर प्रवेश केलेला भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीला पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या क्रीडामंत्री होण्याचा बहुमान मिळाला आहे. सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांनी सोमवारी आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला. यात तृणमूल कॉंग्रेसच्या (टीएमसी) ४३ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीचेही नाव […]

तर भाजप ममता बॅनर्जींची हत्या करु शकते; मंत्र्याचे धक्कादायक विधान
राजकारण

गड आला पण सिंह गेला! बंगाल सहज जिंकलं; ममतांचा मात्र पराभव

कोलकाता : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने सहज विजय प्राप्त करत २००हून अधिक जागांवर विजय मिळवला. मात्र, पक्षाच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मात्र नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपचे उमेदवार आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी ममता यांचा १६२२ मतांनी पराभव केला […]

ममता बॅनर्जींना मोठा दणका; मोठ्या नेत्याचा मंत्रीपदापाठोपाठ आमदारकीचा राजीनामा
राजकारण

ममता बॅनर्जींवर भाजपा विरोधकांकडून कौतुकाचा वर्षाव; कोण काय म्हणाले?

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने मोठी कामगिरी करत आपला गड कायम राखण्याच्या दिशने वाटचाल सुरु केल्यानंतर भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे. समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी यांनी ममताचं कौतुक करत भाजपवर निशाणा साधला आहे. Congratulations @MamataOfficial […]

लॉकडाऊनमध्ये ‘या’ दहा खासदारांनी केलीय सर्वात जास्त मदत; पाहा यादी
राजकारण

राहुल गांधींचा मोठा निर्णय; पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर वाढत असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. राहुल गांधी यांनी सर्व राजकीय नेत्यांना अशा परिस्थितीत गर्दी करत प्रचारसभा घेण्यासंबंधी विचार करण्याचं आवाहन केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये शनिवारी […]

भाजप नेत्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; प्रदेशाध्यक्षांनाही नोटीस
राजकारण

भाजप नेत्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; प्रदेशाध्यक्षांनाही नोटीस

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरु आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने २४ तासांसाठी प्रचारबंदी लागू केल्यानंतर आता भाजप नेत्यावरही कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने भाजपनेते राहुल सिन्हा यांच्यावर कारवाई केली असून ४८ तासांसाठी प्रचारबंदी घालण्यात आली आहे. भाजप नेते राहुल सिन्हा यांनी बिहारमधील सीतलकूची येथे […]

पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावर हिंसाचार; ५ जणांचा मृत्यू
देश बातमी

पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावर हिंसाचार; ५ जणांचा मृत्यू

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान झाले. मात्र, मतदान प्रक्रियेला गालबोट लागलं असून मतदान केंद्राबाहेर रांगेत उभ्या असलेल्या आनंद बर्मन नावाच्या एका तरुण मतदारावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडली. या घटनेमध्ये आनंद बर्मनचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकारानंतर सितालकुचीमध्येच १२६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर झालेल्या गोळीबारामध्ये ४ जणांचा दुपारच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संबंधित […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
राजकारण

भाजपची फजिती; तिकीट न मागताच दोघांना उमेदवारी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेली उमेदवारी नाकारुन दोन उमेदवारांनी पक्षाची फजिती केली आहे. या प्रकरानंतर तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना योग्य गृहपाठ करण्याचा सल्ला दिला आहे. भाजपाने 157 उमेदवारांची यादी जाहीर केली. यापैकी दोघांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. चौरंगी विधानसभा मतदारसंघातून भाजपानं […]

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाल्यास देशव्यापी संदेश जाईल
राजकारण

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाल्यास देशव्यापी संदेश जाईल

पश्चिमबंगाल : “पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला पाहिजे. तेव्हा देशव्यापी आश्वासानाचा संदेश जाईल. मी कोणत्याही अटींशिवाय ममता बॅनर्जींना समर्थन दिलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल,” असा विश्वासही सिन्हा यांनी व्यक्त केला. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी भाजपवर निशाणा साधला. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. […]

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
राजकारण

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल

मुंबई : ”आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल,’ असे सूचक विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. देशात पाच राज्यांमध्ये तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या केंद्रशाषित प्रदेशात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाचही राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीवर […]