देश बातमी

ट्रेनमध्ये अंडरवेअरवर फिरले आमदार; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : बिहारचे जनता दल (यू)चे एक आमदार रेल्वे प्रवासात चक्क अंडरवेअरमध्ये फिरताना दिसले. या प्रकरणाची माहिती त्यांच्या सहप्रवाशांनी दिली आहे. जेडीयूचे आमदार गोपाल मंडल तेजस राजधानी एक्सप्रेसच्या एसी फर्स्ट क्लासच्या डब्यात पाटण्याहून दिल्लीचा प्रवास करत होते. यावेळी ते फक्त अंडरविअर आणि बनियनवर होते. ही घटना गुरुवारी घडली. त्यानंतर या प्रकरणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात […]

देश बातमी

महाराष्ट्रासह बिहार, कर्नाटक आणि गोव्यालाही अतिवृष्टीचा फटका

नवी दिल्ली : गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह बिहार, कर्नाटक आणि गोव्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमधील ११ जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील स्थिती पाहता एअरफोर्सने कमान हाती घेतली आहे. बिहारमधील गोपालगंज, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, सारण, शिवहर, सीतामढी, मुजफ्परपूर, दरभंगा, खगडिया आणि मधुबनी जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. बिहारमध्ये […]

देश बातमी

१४ राज्यात आणि ३ केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल शंभरी पार!

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोना महमारीचे संकट सुरू असताना, दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज (ता. ९) यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. मात्र तरी देखील देशभरातील १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडलेली आहे. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार […]

राजकारण

लोकजनशक्ती पक्षात उभी फूट; पाच खासदारांचे बंड

नवी दिल्ली : बिहारमधील लोकजनशक्ती पक्षात उभी फूट पडल्याचे चित्र आहे. लोकसभेतील सहापैकी पाच खासदारांनी पक्षनेते चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करून त्यांचे काका पशूपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड केली. या बंडामुळे बिहारच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. बंडखोर खासदारांनी नेतेपदी निवड करताच पारस यांनी मी पक्ष फोडलेला नाही, तर वाचवला आहे, अशी प्रतिक्रिया पत्रकारांकडे व्यक्त […]

देश बातमी

जेवणात वाढले नाही माशाचे डोके; लग्नाच्या मांडवात तुफान हाणामारी, ११ जण गंभीर जखमी

पटना : जेवणात माशाचे डोके वाढले नाही म्हणून लग्नाच्या मांडवात तुफान हाणामारी झाल्याची घटना बिहारमधील गोपाळगंजमध्ये घडली आहे. दरम्यान त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. यामध्ये ११ लोकं गंभीर देखील झाले. जेवणात आवडता पिस माशाचे डोके न भेटल्याने ही हाणामारी झाली. ही घटना सिसई टोला भटवालिया गावची आहे. जेवणात माशाचा आवडता पिस न भेटल्याने वऱ्हाडी आणि घरातील […]

देश बातमी

धक्कादायक! कोरोना काळातही आरोग्य केंद्राची केली गोशाळा

पटना : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याचे चित्र असतानाच प्रशासनातर्फे उपलब्ध करुन दिलेल्या आरोग्य व्यवस्थेचा काही ठिकाणी गैरवापर होताना दिसत आहेत. बिहारच्या एका गावामध्ये एका आरोग्य केंद्रात रुग्णांऐवजी चक्क गायी बांधण्यात आल्याचे समोर आला आहे. त्यामुळे बिहारच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. बिहार मधुबनीच्या खाजौलीतील सुक्की गावात कोरोना काळातही सरकारी […]

देश बातमी

धक्कादायक ! बिहारनंतर यूपीमध्ये नदीत तरंगताना आढळले मृतदेह

लखनौ : बिहारच्या बक्सरमध्ये चौथा शहरात गंगा नदीच्या किनाऱ्यावर सुमारे १०० मृतदेह आढळले होते. त्यानंतर प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश मधून वाहून आल्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील गाझीपुरातील गंगेच्या काठी मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. हे मृतदेह कोरोनाबाधितांचे असल्याची शंका देखील व्यक्त करण्यात येत आहे. गाझीपूरमधील गंगेच्या किनाऱ्यावर काही मृतदेह […]

देश बातमी

भयानक ! बिहारमध्ये कोरोनाग्रस्तांचे मृतदेह पाण्यात; गंगेच्या किनारी मृतदेहांचा खच

पटना : एकीकडे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना गंगेच्या किनारी कोरोना रुग्णांचे मृतदेह वाहून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे प्रशासन चिंतेत आहे. बिहारमधील बक्सममध्ये गंगेच्या किनारी लागलेला मृतदेहांचा ढीग पाहून गावकरीदेखील घाबरले आहेत. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, चौशा शहरात हा प्रकार घडला आहे. गावकरी सकाळी जेव्हा नदी किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा तेथील […]

मनोरंजन

धक्कादायक! सुशांत सिंह राजपूतच्या मावस भावासह एकावर जीवघेणा हल्ला

सहरसा : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने याने काही दिवसांपूर्वी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.या घटनेने सुशांत सिंहच्या कुटुंबीयांसह त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. आता पुन्हा एक दुःखद बातमी समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या एका सहकाऱ्यांवर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात […]

राजकारण

यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती : नितीश कुमार

बिहार : ”यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती. मात्र माझ्यावर हे पद स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला.” असा धक्कादायक खुलासा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे. तसेच, कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्री केलं तरी मला त्याचा फरक पडणार नाही. या पदावर राहण्याची माझी जराही इच्छा नाहीय, अशा शब्दांमध्ये नितीश यांनी म्हटलं आहे. नितीश कुमार यांनी नोव्हेंबर […]