इशांतची मोठी कामगिरी; कपिल, जहीरनंतर अशी कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज
क्रीडा

इशांतची मोठी कामगिरी; कपिल, जहीरनंतर अशी कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज

चेन्नई : इंग्लंडविरुद्ध चेन्नईत सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इशांत शर्माने मोठी कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्मानं कसोटी सामन्यात ३०० बळी घेण्याचा कारनामा केला आहे. असा पराक्रम करणारा इशांत तिसरा वेगवान भारतीय गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरोधात चेन्नई येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावांत गोलंदाजी करताना इशांत शर्मानं लॉरेन्सला बाद करत ऐतिहासिक कामगिरी […]

इंग्लंडकडे मोठी आघाडी; भारताचा दुसरा डाव ३३७ धावांवर आटोपला
क्रीडा

इंग्लंडकडे मोठी आघाडी; भारताचा दुसरा डाव ३३७ धावांवर आटोपला

चेन्नई : पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडला पहिल्या डावानंतर मोठी आघाडी मिळाली आहे. भारतीय संघाचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला असून ५७९ धावांचा पाठलाग करताना भारताच्या खराब फलंदाजीमुळे इंग्लंडला पहिल्या डावाअखेर २४१ धावांची मोठी आघाडी मिळाली. ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला किमान तीनशेपार मजल मारता आली. इतर […]

दुसरा दिवसही पाहुण्यांच्या नावावर; इंग्लंडने उभारला धावांचा डोंगर
क्रीडा

दुसरा दिवसही पाहुण्यांच्या नावावर; इंग्लंडने उभारला धावांचा डोंगर

चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसरा दिवसही पाहुण्या इंग्लंड संघाच्याच नावावर राहिला आहे. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडच्या संघाने ८ बाद ५५५ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार जो रूटचे दमदार द्विशतक आणि डॉम सिबली, बेन स्टोक्स यांची अर्धशतके यांच्या जोरावर इंग्लंडने धावांचा डोंगर उभारला. आजच्या दिवसातील पहिल्या दोन सत्रांवर इंग्लंडने पूर्णपणे वर्चस्व राखल्यानंतर शेवटच्या सत्रात भारतीय गोलंदाजांना काहीसं […]

पहिला दिवस इंग्लंडचा; रूटची शतकी खेळी
क्रीडा

पहिला दिवस इंग्लंडचा; रूटची शतकी खेळी

चेन्नई : भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर राहिला आहे. दिवसअखेर इंग्लंडच्या संघाने ३ बाद २६३ धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या सत्रात दोन गडी गमावल्यानंतर संपूर्ण दिवस सलामीवीर डॉम सिबली आणि जो रूट यांनी खेळून काढत संघाला भक्कम स्थितीत आणले. रूटने नाबाद शतक ठोकलं, पण सिबली शेवटच्या सत्रात ८७ धावांवर पायचीत झाला आणि […]

मायदेशात पहिली कसोटी खेळण्यापूर्वी बुमराहच्या नावावर दोन आगळावेगळे विक्रम
क्रीडा

मायदेशात पहिली कसोटी खेळण्यापूर्वी बुमराहच्या नावावर दोन आगळावेगळे विक्रम

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध आज सुरू झालेल्या सामन्याआधीच बुमराहने एक आगळावेगळा पराक्रम करत एका विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१८मध्ये जसप्रीत बुमराहने कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर प्रत्येक दौऱ्यावर बुमराहने स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली. पण घरच्या मैदानावर पहिली कसोटी खेळण्याआधी विदेशात सर्वाधिक कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने थेट विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. बुमराहने इंग्लंडविरूद्ध […]

भारतासाठी नवं आव्हान तयार; पाहा इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक
क्रीडा

भारतासाठी नवं आव्हान तयार; पाहा इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा २-१नं पराभव करत कसोटी मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी पुढचं आव्हान तयार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येत असून पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीनं १८ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. हार्दिक पांड्या आणि इशांत शर्मा […]