बातमी महाराष्ट्र

प्राण्यांना भूकंपाबद्दल माणसांआधीच माहिती मिळते? ‘आपण’ त्यांचे संकेत कसे ओळखू शकतो?

सध्या भारतात अनेक भागात कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसत असल्याच्या बातम्या आपण पाहत आहोत. आजच महाराष्ट्रात नाशिक, पालघर आदी भागात भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भूकंपाविषयी अनेक प्रश्न समोर येत आहेत. प्राण्यांना भूकंपाबद्दल माणसांआधीच माहिती मिळते? ‘आपण’ त्यांचे संकेत कसे ओळखू शकतो? पशु वैद्यांच्या तज्ज्ञांच्या हवाल्याने डीएनएने दिलेल्या माहितीनुसार, प्राण्यांची ऐकण्याची क्षमता […]

बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ‘या’ शहराला भूकंपाचा हादरा; ३.७ रिश्टर स्केल तीव्रता

मुंबई : आज (ता. २४) महाराष्ट्रातील पालघर शहराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. आज सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांनी हे धक्के जाणवले. ३.७ रिश्टर स्केल या भूकंपाची तीव्रता होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने ही माहिती दिली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मे महिन्यात यापुर्वी पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यामधील काही भागांमध्ये सकाळी ९.१६ मिनिटांनी […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा भूकंप

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यामधील काही भागांमध्ये सकाळी ९.१६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे. गेल्या २ महिन्यामध्ये कोयना धरण परिसरात बसलेला भूकंपाचा हा तिसरा धक्का असल्यामुळे स्थानिकांमध्ये भिती आणि चिंतेचं वातावरण वाढू लागलं आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या हवाल्याने हे […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

पश्चिम महाराष्ट्राला भूकंपाचे धक्के

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावाचे आधीच मोठे संकट असताना पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. कोयना धरण व परिसराला शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे दोन सौम्य धक्के बसले. भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता २.९ व ३.०० रिश्टर स्केल अशी नोंदली गेली. पहिला धक्का २.५५ मिनिटांनी तर, तर भूकंपाचा दुसरा धक्का लगेचच ३ […]

देश बातमी

राजधानी दिल्लीला भूकंपाचे हादरे

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला भूकंपाचे हादरे बसले आहेत. राजस्थानमधील अलवार जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा हा भूकंप झाला असून दिल्ली-एनसीआरपर्यंत त्याचे हादरे जाणवले आहेत. रात्री ११ वाजून ४६ मिनिटांनी झालेल्या हा मध्यम स्वरुपाचा हा भूकंप ४.२ रिश्टर स्केल इतका होता. दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवू लागल्यानंतर लोकं आपल्या घरातून बाहेर पडले होते. अलवार हे भूकंपाचे […]