पश्चिम महाराष्ट्र बातमी

राधानगरी धरणाचे उघडले चार दरवाजे; पुराचा धोका कायम

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने उघडीप घेतल्याने पूरग्रस्त जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. तथापि सायंकाळपासून पावसाची पुन्हा रिपरिप सुरु झाल्याने पुराची धास्ती वाढीस लागली आहे. अद्यापही पंचगंगा नदीचे पाणी धोका पातळीवरून वाहत आहे. अशातच राधानगरी धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे रविवारी उघडण्यात आले असून, त्यात ७११२ क्युसेस विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोल्हापुर जिल्ह्याला पुराचा […]

देश बातमी

महाराष्ट्रासह बिहार, कर्नाटक आणि गोव्यालाही अतिवृष्टीचा फटका

नवी दिल्ली : गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह बिहार, कर्नाटक आणि गोव्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमधील ११ जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील स्थिती पाहता एअरफोर्सने कमान हाती घेतली आहे. बिहारमधील गोपालगंज, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, सारण, शिवहर, सीतामढी, मुजफ्परपूर, दरभंगा, खगडिया आणि मधुबनी जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. बिहारमध्ये […]