निकिता जेकब यांना उच्च न्यायालयाकडून ३ आठवड्यांचा ट्रान्झिट अटकपूर्व जमीन मंजूर
देश बातमी

निकिता जेकब यांना उच्च न्यायालयाकडून ३ आठवड्यांचा ट्रान्झिट अटकपूर्व जमीन मंजूर

टूलकिट (दस्तावेज) प्रकरणी संशयित असलेल्या वकील निकिता जेकब यांच्या ट्रान्झिट अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. टूलकिट प्रकरणात दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर तसेच दिल्ली पोलीस अटकेसाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर जेकब यांनी अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज मुंबई उच्च न्यायालयाने निकिता जेकब यांना ३ आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. […]

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला…
राजकारण

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला…

मुंबई : ”लता मंगेशकर आमचे दैवत आहेत, मात्र शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सेलिब्रिटीजनी केलेल्या ट्विटसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते. या प्रकरणात भाजपाच्या आयटी सेलचा सहभाग असण्याची शक्यता वाटल्याने मी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. .” असं स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलाताना सांगितलं. दरम्यान, केंद्रीय कृषी […]

शेतकऱ्यासंबधी केलेल्या धक्कादायक विधानानंतर जे.पी. दलाल यांचा सरवासारव करण्याचा प्रयत्न
राजकारण

शेतकऱ्यासंबधी केलेल्या धक्कादायक विधानानंतर जे.पी. दलाल यांचा सरवासारव करण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : “माझ्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्यांची माफी मागतो. माझं विधान चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं,” असं म्हणत हरियाणाचे कृषीमंत्री जे.पी. दलाल यांनी रोष थोपवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, जे.पी. दलाल यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात ते ”शेतकरी आंदोलनास्थळी मरण पावलेले शेतकरी घरी असते, तरी मेले असते, असे धक्कादायक […]

राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा; केवळ कायदे रद्द करायला सांगितले आहे…
देश बातमी

राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा; केवळ कायदे रद्द करायला सांगितले आहे…

करनाल : मोदी सरकारने आमचे डोके जास्त फिरवू नये. देशातील शेतकरी आणि जवानांनी केवळ कायदे रद्द करायला सांगितले आहे. सत्तेमधून बाहेर पडायला नाही, असा थेट इशाराच भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. करनाल येथे आयोजित करण्यात आलेल्या किसान महापंचायतला संबोधित करताना राकेश टिकैत बोलत होते. गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर […]

डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से; प्रियांका गांधीचा केंद्र सरकारवर निशाणा
राजकारण

डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से; प्रियांका गांधीचा केंद्र सरकारवर निशाणा

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनासंबंधीचं टूलकिट शेअर केल्याप्रकरणी २२ वर्षांच्या पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम विभागानं रविवारी बंगळुरूतून अटक केली. दिशा रवीच्या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या अटकेवरून कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दिशा रवीच्या अटकेनंतर प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला […]

बोल कि लब आज़ाद हैं तेरे; दिशा रवीच्या अटकेवरून राहुल गांधीचा केंद्रावर हल्लाबोल
राजकारण

बोल कि लब आज़ाद हैं तेरे; दिशा रवीच्या अटकेवरून राहुल गांधीचा केंद्रावर हल्लाबोल

नवी दिल्ली : गेल्या अडीच महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासंबंधीचं टूलकिट शेअर केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २२ वर्षांच्या पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम विभागानं रविवारी बंगळुरूतून अटक केली. रवी दिशाच्या या अटकेवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकरी आंदोलनासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मोदी […]

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर शेतकऱ्यांसह १६ विरोधी पक्षांचा बहिष्कार; शेतकरीही आपल्या मागणीवर ठाम
देश बातमी

शेतकरी आंदोलन; शेतकरी आंदोलकांचा १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको आंदोलनाचा निर्णय

नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत आज शेतकरी आंदोलकांनी १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी १२ ते ४ असे चार तास हे आंदोलन केलं जाणार आहे. १४ फेब्रुवारीला देशभरात कॅण्डल मार्च आणि मशाल मोर्चा काढला जाणार आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा मोर्चा काढला जाईल.अशी […]

कंगनाला रडू अनावर; घरातल्या महत्वाच्या व्यक्तीचं निधन
मनोरंजन

कंगना रानौत ट्वीटरला ठोकणार रामराम; कारण….

अभिनेत्री कंगना रानौत गेल्या काही महिन्यांपासून ट्वीटरवर खूपच चर्चेत आहे. असा कोणताच मुद्दा नाही ज्यावर कंगना आपले मत मांडत नाही. ट्विटरवर आपली मते परखडपणे मांडत असते. मात्र आता कंगना ट्वीटर ला रामराम ठोकणार आहे, हो खुद्द कंगनानेच ट्वीटरला रामराम ठोकणार असल्याचे जाहीर केले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर कंगनाचे प्रत्येक ट्विट चर्चेत होते. महाराष्ट्र […]

शेतकरी नेत्यांना आंदोलनाच्या नावाखाली तमाशा करण्यात रस
पश्चिम महाराष्ट्र बातमी

शेतकरी नेत्यांना आंदोलनाच्या नावाखाली तमाशा करण्यात रस

कोल्हापूर : “दोन महिन्यांहून अधिक काळ राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. केंद्र शासनाने सुरुवातीपासून शेतकऱ्यांशी आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या चारपैकी तीन मागण्या मान्य करूनही विरोध सुरू असून तो नेमका कशासाठी आहे याचे गमक कळलं नाही. शेतकरी नेत्यांना आंदोलनाच्या नावाखाली तमाशा करण्यात रस आहे,” अशी टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली […]

जयंत पाटलांच्या मुलाच्या नेतृत्त्वात ट्रॅक्टर मोर्चा; प्रतिक पाटलांचे राजकीय प्रवेशाचे संकेत
राजकारण

जयंत पाटलांच्या मुलाच्या नेतृत्त्वात ट्रॅक्टर मोर्चा; प्रतिक पाटलांचे राजकीय प्रवेशाचे संकेत

सांगली : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी जयंत युवा किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांच्या नेतृत्त्वात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. आष्ठा ते इस्लामपूर या मार्गावरुन हा मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. […]