अण्णा हजारे भारावले, देवेंद्र फडणवीसांचे केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, ध्येयवादी माणसेच…
राजकारण

अण्णा हजारे भारावले, देवेंद्र फडणवीसांचे केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, ध्येयवादी माणसेच…

अहमदनगर : तब्बल बारा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर राज्यात लोकायुक्त कायद्याचे विधेयक विधिमंडळात येत असल्याने यासाठी पाठपुरावा करीत असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केले आहे. याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले. ते म्हणाले, ‘सत्तेची हवा डोक्यात गेल्यावर अनेक लोक बदलतात, मात्र काही ध्येयवादी लोक नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत असतात.’ हे विधेयक आणत […]

अण्णांचा ठाकरे सरकारला दिला इशारा; पुन्हा उपोषणाला बसणार
राजकारण

अण्णांचा ठाकरे सरकारला दिला इशारा; पुन्हा उपोषणाला बसणार

नगर : हे सरकार फक्त पडण्यासाठी घाबरत आहे, त्यामुळे हे सरकार मोर्चे आंदोलनाला घाबरत नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी आणि महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व्हावा यासाठी लोकायुक्त कायदा लागू करावा, या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. जनतेकडे सर्वाधिकार मिळाल्याने भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर लोकपाल व लोकायुक्त कायदा खूप प्रभावी व सक्षम असा कायदा आहे. जनतेने […]

रघुनाथ पाटलांचा अण्णा हजारेंना सल्ला; आता अण्णांनी निवृत्ती घ्यावी
राजकारण

रघुनाथ पाटलांचा अण्णा हजारेंना सल्ला; आता अण्णांनी निवृत्ती घ्यावी

सांगली : ”अण्णा हजारे यांनी आता निवृत्ती घ्यावी आणि उर्वरित आयुष्य शांतपणे जगावे,” असे वक्तव्य शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे. शेतकरी आंदोलनावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरुवातीला दिलेला आंदोलनाचा इशारा दिला. मात्र भाजप नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर अण्णांनी आंदोलन मागे घेतले. अण्णांच्या या भूमिकेवर रघुनाथ पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अण्णांच्या […]

 अग्रलेख लिहिण्याचं कारण काय ते सांगा मी सगळंच बाहेर काढतो; अण्णा हजारे
राजकारण

 अग्रलेख लिहिण्याचं कारण काय ते सांगा मी सगळंच बाहेर काढतो; अण्णा हजारे

अहमदनगर : ”कोणा एका पक्षापेक्षा आम्ही समाज आणि देशाला प्राधान्य देतो. अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात मांडण्याच आलेल्या मुद्द्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच, तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही तो कसा पाठीशी घातला याबाबतची सगळी माहितीच देईन असा इशाराच अण्णांनी दिला. आजचा अग्रलेख लिहिण्याचं […]

या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या! शिवसेनेचा अण्णा हजारेंना सवाल
राजकारण

या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या! शिवसेनेचा अण्णा हजारेंना सवाल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून शेतकर-यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. मात्र शुक्रवारीच(ता. २९) त्यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला. अण्णा हजारे हे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, स्वामीनाथन आयोगाची अंमबजावणी करावी, या शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. मात्र केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री राधाकृष्ण […]

देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंचा उपोषणाचा निर्णय मागे
बातमी महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंचा उपोषणाचा निर्णय मागे

राळेगणसिध्दी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारीपासून शेतकर-यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. मात्र आता त्यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला आहे. अण्णा हजारे हे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, स्वामीनाथन आयोगाची अंमबजावणी करावी, या व शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज दुपारी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विरोधी […]

अण्णा हजारेंनी घेतला निर्णय; शेतकऱ्यांसाठी ‘या’ तारखेपासून उपोषण
बातमी महाराष्ट्र

अण्णा हजारेंनी घेतला निर्णय; शेतकऱ्यांसाठी ‘या’ तारखेपासून उपोषण

नवी दिल्ली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३० जानेवारी रोजी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीपासून या उपोषणाला राळेगणसिद्धी येथून सुरुवात होणार आहे. पाठिंबा देणाऱ्यांनी आपापल्या ठिकाणांहून यात सहभाग व्हावं, असं आवाहनही हजारे यांनी केलं आहे. वारंवार आम्ही सरकारकडे आमच्या मागण्या मांडल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत पंतप्रधान आणि कृषी […]

शेतकरी आंदोलनाला अण्णा हजारेंचा पाठिंबा; म्हणतात…
देश बातमी

शेतकरी आंदोलनाला अण्णा हजारेंचा पाठिंबा; म्हणतात…

नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पाठिंबा दिला असून दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन देशभर पसरलं पाहिजे असं त्यांनी म्हटले आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी आज भारत बंदची हाक दिली असून देशभरात बंद पाळला जात आहे. या बंदच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशा […]

सरकार आणि शेतकऱ्यांमधील परिस्थिती भारत-पाकिस्तानसारखी; अण्णा हजारेंचा केंद्रावर निशाणा
देश बातमी

सरकार आणि शेतकऱ्यांमधील परिस्थिती भारत-पाकिस्तानसारखी; अण्णा हजारेंचा केंद्रावर निशाणा

राळेगणसिद्धी : “सरकार आणि शेतकऱ्यांमधील सध्याची परिस्थिती ही भारत-पाकिस्तानसारखी झाली आहे. शेतकऱ्यांचं न ऐकायला ते काय पाकिस्तानातून आलेत का?” असा खोचक सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी विचारला आहे. केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात उडी घेत पाठींबाही दर्शवला आहे. अण्णा हजारे म्हणाले, “कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला सरकारकडून दिली जाणारी […]