अफगाणिस्तानने बांगलादेशचा उडवला धुव्वा, जे भारत-पाकिस्तानला जमलं नाही ते करून दाखवलं…
क्रीडा

अफगाणिस्तानने बांगलादेशचा उडवला धुव्वा, जे भारत-पाकिस्तानला जमलं नाही ते करून दाखवलं…

दुबई : अफगाणिस्तानने बांगलादेशचा धुव्वा उडवल्याचे पाहायला मिळाले. या विजयासह अफगाणिस्तानने मानाचे स्थान पटकावले आहे. भारत आणि पाकिस्तानसारख्या संघांनाही जे करता आले नाही ते अफगाणिस्तानसारख्या संघाने करून दाखवले आहे अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातील बांगलादेशला एकामागून एक धक्के दिले. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण अफगाणिस्तानचे गोलंदाज यावेळी त्यांच्यावर भारी पडले. फिरकीपटू मुजीब […]

अमेरिकेच्या माघारीनंतर काबूल विमानतळावर तालिबानचा ताबा
बातमी विदेश

अमेरिकेच्या माघारीनंतर काबूल विमानतळावर तालिबानचा ताबा

काबूल : काबूलमधून अमेरिकेने सैन्य माघारी घेतल्यानंतर मंगळवारी काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाचा तालिबानने ताबा घेतला. अमेरिकेचे शेवटचे विमान धावपट्टीवरून उडाल्यानंतर तालिबानने विमानतळ ताब्यात घेतले. असे असले तरी काही अफगाणी लोक अजूनही परदेशात जाण्याच्या विचारात आहेत. हमीद करजाई विमानतळावर एकच धावपट्टी असून विमानतळाच्या लष्करी भागाकडे काही वाहने उभी होती. तालिबानी नेत्यांनी सांगितले की, आमच्या माजी विरोधकांना आम्ही […]

अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारताचा मोठा निर्णय
राजकारण

अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारताचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य स्थापन झाल्यानंतर, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. या ठरावामध्ये अफगाणिस्तानची जमीन इतर कोणत्याही देशाविरुद्धच्या कारवाईसाठी वापरू नये अशी मागणी करण्यात आली आहे. हा ठराव मंजूर करण्यात भारताने मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. या प्रस्तावात सक्रिय भूमिका बजावली आहे. ५ स्थायी आणि १० अस्थायी सदस्य असलेल्या […]

अमेरिकेने केला काबूलच्या हल्लेखोरांचा खात्मा
बातमी विदेश

अमेरिकेने केला काबूलच्या हल्लेखोरांचा खात्मा

नवी दिल्ली : अमेरिकेने काबूलच्या हल्लेखोरांचा खात्मा केला आहे. शनिवारी पहाटे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनांच्या तळांवर ड्रोनने बॉम्ब हल्ले केले. काबूलमधील हल्लेखोरांना धडा शिकवू असं अमेरिकने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. अवघ्या ४८ तासांमध्ये अमेरिकेने काबूल विमानतळावर हल्ला केल्यानंतर जबाबदारी स्वीकारणाऱ्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या तळांवर बॉम्ब हल्ले केले. यासंदर्भातील […]

काबूल विमानतळावर मोठा स्फोट; अनेकजण मृत्यूमुखी
बातमी विदेश

काबूल विमानतळावर मोठा स्फोट; अनेकजण मृत्यूमुखी

काबूल : अफगाणिस्तानात तालिबाननं सत्ता प्रस्थापित केल्यानंतर दहशतीचं वातावरण कायम आहे. अशात अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघातकी हल्ले झाले आहेत. या हल्ल्याची खात्री पेंटागन प्रवक्त्यांनी केली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार दोन हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. त्याचबरोबर तीन अमेरिकन सैनिकांसह १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि […]

अफगाणिस्तानच्या मंत्र्याचे हाल; करावे लागतेय डिलिव्हरी बॉयचं काम
बातमी विदेश

अफगाणिस्तानच्या मंत्र्याचे हाल; करावे लागतेय डिलिव्हरी बॉयचं काम

काबूल : अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यासह मंत्र्यांनी पळ काढला. तालिबानच्या कामाची पद्धत माहिती असल्याने मृत्यूदंडाशिवाय दुसरी शिक्षा नाही, अशी भीती राष्ट्रपतींसह मंत्र्यांना होती. मात्र अफगाणिस्तानातून इतर देशात गेल्यानंतर अनेकांना रोजीरोटीचा प्रश्न भेडसावू लागला आहे. दुसऱ्या देशात गेल्यानंतर तिथलं राहणीमान आणि पद्धत शिकून घेताना नागरिकांना अडचणी येत आहेत. अशात एका […]

अफगाणिस्तानातील बौद्ध स्थळांबाबत तालिबानचा मोठा निर्णय
बातमी विदेश

अफगाणिस्तानातील बौद्ध स्थळांबाबत तालिबानचा मोठा निर्णय

तालिबानने जवळपास संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. लवकरच तालिबान त्यांच्या स्वतःच्या कायद्यानुसार राज्य करेल. दरम्यान, तालिबानने श्रीलंकेला आश्वासन दिले आहे की, त्यांच्या सरकार अंतर्गत अफगाणिस्तानातील बौद्ध स्थळांचे कोणतेही नुकसान होणार नाही. ‘डेली मिरर’ नुसार, तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाले की तालिबानचा LTTE म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमशी कोणताही संबंध नाही. आम्ही एक स्वतंत्र शक्ती […]

अफगाणिस्तानी राजदूतांच्या मुलीचे पाकिस्तानमध्ये अपहरण
बातमी विदेश

अफगाणिस्तानी राजदूतांच्या मुलीचे पाकिस्तानमध्ये अपहरण

नवी दिल्ली : पाकिस्तानात कोणीही सुरक्षित नाही. शनिवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानचे राजदूत नजीबुल्ला अलीखील यांची मुलगी सिलसिलाचे अपहरण केल्यानंतर तिला क्रूरपणे वागणूक देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अपहरणानंतर काही तासांनी तिला सोडण्यात आले. शनिवारी हे प्रकरण उघडकीस आले. सोडण्यापूर्वी अपहरणकर्त्यांनी तिच्यावर अत्याचार केला होता. अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजने ही माहिती दिली आहे. यासंदर्भात माहिती देताना अफगाणच्या […]