अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस-भाजपात जुंपली; इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस आक्रमक
राजकारण

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस-भाजपात जुंपली; इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस आक्रमक

मुंबई : राज्यात कोरोना संकटाने डोके पुन्हा वर काढलेले असतानाच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून सुरुवात झाली. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. काँग्रेस नेत्यांकडून केंद्रातील मोदी सरकाविरोधी घोषणा देत इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली होती. तर, सभागृहाच्या बाहेर भाजपा नेते राज्य सरकारविरोधात घोषणा देत होते. रॅली विधानभवनाजवळ पोहोचताच काँग्रेस […]

वाढत्या रुग्ण्संख्येच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
कोरोना इम्पॅक्ट

वाढत्या रुग्ण्संख्येच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे मुंबईतील स्थितीचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, यापूर्वी झालेल्या बैठकीत रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत […]

अण्णा हजारेंनी घेतला निर्णय; शेतकऱ्यांसाठी ‘या’ तारखेपासून उपोषण
बातमी महाराष्ट्र

अण्णा हजारेंनी घेतला निर्णय; शेतकऱ्यांसाठी ‘या’ तारखेपासून उपोषण

नवी दिल्ली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३० जानेवारी रोजी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीपासून या उपोषणाला राळेगणसिद्धी येथून सुरुवात होणार आहे. पाठिंबा देणाऱ्यांनी आपापल्या ठिकाणांहून यात सहभाग व्हावं, असं आवाहनही हजारे यांनी केलं आहे. वारंवार आम्ही सरकारकडे आमच्या मागण्या मांडल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत पंतप्रधान आणि कृषी […]

लंडनच्या भारतीय दूतावासाबाहेर शेतकरी समर्थनार्थ आंदोलनात भारतविरोधी घोषणाबाजी
बातमी विदेश

लंडनच्या भारतीय दूतावासाबाहेर शेतकरी समर्थनार्थ आंदोलनात भारतविरोधी घोषणाबाजी

भारतात गेल्या दहा दिवसांपासून कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. ब्रिटनची राजधानी लंडन मध्येही या शेतकरी आंदोलनाचे पडसाद रविवारी पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ब्रिटनमध्ये रविवारी भारतीय दुतावासाबाहेर मोठे आंदोलन करण्यात करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली तसेच खलिस्तानवादी झेंडेही फडकले. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यानंतर या आंदोलनाबाबत ब्रिटनच्या लंडनस्थित […]

दिल्लीत शेतकरी आक्रमक; मोदींचा पुतळा जाळत सरकारी प्रस्तावाला केराची टोपली
देश बातमी

दिल्लीत शेतकरी आक्रमक; मोदींचा पुतळा जाळत सरकारी प्रस्तावाला केराची टोपली

नवी दिल्ली : केंद्र सरकारने संसदेत कायदे मंजूर केल्यपासून कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी चलो दिल्लीची हाक दिली होती. दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून सीमेवरच रोखण्यात आले. दिल्लीत जाण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. केंद्र सरकारनं आंदोलनासाठी सूचवलेल्या पर्याय नाकारत शेतकऱ्यांनी आंदोलन […]