या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी : नरेंद्र मोदी
राजकारण

या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : “श्रमजीवी, बुद्धिजीवी यांसारखे शब्द आपल्या खूपच परिचयाचे आहेत. मात्र, मी पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी. वकिलांचं, विद्यार्थ्यांचं, कामगारांचं कुणाचंही आंदोलन असेल हे आंदोलनजीवी सर्व ठिकाणी उपस्थित असतात. हे कधी पडद्यामागे तर कधी पडद्याच्या पुढेही असतात. यांची एक टोळी आहे. हे लोक आंदोलनांशिवाय जगू […]

अखेर नरेंद्र मोदी कृषी कायद्यांवर बोलले; म्हणाले…
देश बातमी

अखेर नरेंद्र मोदी कृषी कायद्यांवर बोलले; म्हणाले…

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. देशभरातून कृषी कायद्यांना विरोध होत असून शेतकऱ्यांसह विरोधकांकडूनही हे कायदे रद्द करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनात झालेल्या घडामोडींवर आता पर्यंत शांत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले आहे. पंतप्रधानांनी कृषी मंत्र्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा हवाला […]

शरद पवारांनी नरेंद्र सिंह तोमर यांना सुनावले; जेव्हा मी कृषीमंत्रीपदाची सूत्रं स्वीकारली….
राजकारण

शरद पवारांनी नरेंद्र सिंह तोमर यांना सुनावले; जेव्हा मी कृषीमंत्रीपदाची सूत्रं स्वीकारली….

मुंबई : नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिन्ही कायद्यांवर ट्विट करून भाष्य केलं होतं. त्याला विद्यमान केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी प्रत्युत्तरही दिलं. तोमर यांनी उत्तर दिल्यानंतर शरद पवार यांनी ट्विट करत कृषीमंत्र्यांना खडे बोल सुनावले आहे. दरम्यान, शरद […]

देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंचा उपोषणाचा निर्णय मागे
बातमी महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंचा उपोषणाचा निर्णय मागे

राळेगणसिध्दी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारीपासून शेतकर-यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. मात्र आता त्यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला आहे. अण्णा हजारे हे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, स्वामीनाथन आयोगाची अंमबजावणी करावी, या व शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज दुपारी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विरोधी […]

दिल्ली हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलकांचा मोठा निर्णय
देश बातमी

दिल्ली हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलकांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर भारतीय किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघानं आपलं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही संघटनांचे नेते व्ही. एम. सिंग आणि ठाकूर भानूप्रताप सिंह यांनी बुधवारी याची घोषणा केली. […]

दिल्ली पोलीस शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देणार?
देश बातमी

दिल्ली पोलीस शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देणार?

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. मात्र या रॅलीला सरकारकडून विरोध करण्यात आला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या परवानगीने रॅली काढण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर आता शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांकडे रॅली काढण्यासाठी रितसर परवानगी मागितली आहे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीसंदर्भात पोलिसांकडून साडेचार वाजता महत्त्वाची माहिती दिली जाण्याची […]

शेतकरी आणि केंद्रसरकारमध्ये आज पुन्हा बैठक; तोडगा निघण्याची शक्यता
देश बातमी

शेतकरी आणि केंद्रसरकारमध्ये आज पुन्हा बैठक; तोडगा निघण्याची शक्यता

मेरठ : सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय कृषी कायद्यांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिल्यानंतर केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये ९वी बैठक आज होणार आहे. आजच्या बैठकीत नक्कीच काहीतरी तोडगा निघेल, अशी अपेक्षा सरकारला आहे. शेतकरी आंदोलनाचा आज 51 वा दिवस आहे. शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 51 दिवसांपासून शेतकऱ्यांचं दिल्लीच्या वेशीवर […]

केंद्रातील सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील; सुप्रिया सुळेंचा आरोप
राजकारण

केंद्रातील सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील; सुप्रिया सुळेंचा आरोप

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला त्याचे स्वागत. कोर्टाच्या या निर्णयाबद्दल मी त्यांची आभारी आहे. केंद्रातील सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील आहे.या कायद्यांबद्दल सर्व घटकांना विश्वासात घ्या अशी आम्ही मागणी करत होतो, असे ट्वीट करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषी कायद्यांच्या स्थगितीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. केंद्र सरकारने बनवलेल्या तीन कृषी […]

अखेर केंद्रीय कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
देश बातमी

अखेर केंद्रीय कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या दीड महिन्यापासून केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. मात्र आज अखेर सर्वोच्च न्यायालयाने या केंद्रीय कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच कोर्टाने चार सदस्यीय समितीचीही स्थापना केली आहे. या समितीत कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी, हरसिमरत मान, प्रमोद जोशी आणि अनिल […]

सर्वोच्च न्यायालयात शेतकरी आंदोलनाबाबत आज सुनावणी होणार; कृषी कायद्यांना स्थगिती मिळणार?
देश बातमी

सर्वोच्च न्यायालयात शेतकरी आंदोलनाबाबत आज सुनावणी होणार; कृषी कायद्यांना स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आज आंदोलक आणि कृषी कायद्यांशी संबंधित सर्व प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. वरिष्ठ वकील प्रशांत भूषण आणि दुष्यंत दवे शेतकऱ्यांची बाजू कोर्टात मांडणार आहेत. राजधानी दिल्लीच्या सिंधू सीमेवर पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांचं गेल्या 47 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. आतापर्यंत केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत अनेक […]