जर, केंद्राकडून लस विनामुल्य मिळाली नाही तर आम्ही मोफत लस देऊ : मुख्यमंत्री
राजकारण

जर, केंद्राकडून लस विनामुल्य मिळाली नाही तर आम्ही मोफत लस देऊ : मुख्यमंत्री

नवी दिल्ली : येत्या १६ जानेवारी २०२१ पासून कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा देशभरात सुरु होणार आहे. या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारांना लस देण्यात येणार आहे. दरम्यान, जर केंद्राकडून ही लस विनामूल्य मिळाली नाही तर आम्ही मोफत लस देऊ. असे विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. याबाबत बोलताना […]

सीरम इंस्टिट्यूटच्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे आजपासून देशभरात वितरण सुरु
देश बातमी

सीरम इंस्टिट्यूटच्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे आजपासून देशभरात वितरण सुरु

पुणे : देशभरात येत्या १६ जानेवारीपासून लसीकरणासला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे पुण्याच्या ‘सीरम इंस्टिट्यूट’ला केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर मिळाल्यानंतर आजपासून सीरमच्या कोरोना प्रतिबंधक अशा ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे वितरण सुरू झाले आहे. सीरम इन्स्टिटयूटमधून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनर रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळाल्या माहितीनुसार, कोव्हिशिल्ड’ लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनर […]

सीरम इंस्टिट्यूट’ला केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर
देश बातमी

सीरम इंस्टिट्यूट’ला केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर

नवी दिल्ली : एकीकडे देशभरात येत्या १६ जानेवारीपासून लसीकरणासला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे पुण्याच्या ‘सीरम इंस्टिट्यूट’ला केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर मिळाल्याचीही माहिती समोर आली आहे. एएनआय या वृत्त संस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला केंद्र सरकारने पहिली ऑर्डर दिली आहे. यासोबत लशीच्या एका डोसची किंमत २०० रुपये इतकी असेल. अशी माहितीही सीरम […]

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला राज्यसरकारची परवानगी; मात्र कोरोनाविषयक नियमांचे पालन अनिवार्य
क्रीडा

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला राज्यसरकारची परवानगी; मात्र कोरोनाविषयक नियमांचे पालन अनिवार्य

मुंबई : राज्यसरकारने महाराष्ट्र केसरी किताब लढत आणि ६४व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला परावागगी दिली आहे. मात्र त्यांना कोरोनाविषयक सर्व शिष्टाचारांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पाठपुरावा केला होता. आता कुस्ती स्पर्धेला परवानगी दिल्यामुळे राज्य कुस्तिगीर परिषदेनंही सरकारचे जाहीर आभार मानले आहेत. ‘‘शासनाने […]

गुड न्यूज: सिरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी
कोरोना इम्पॅक्ट देश बातमी

गुड न्यूज: सिरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी

नवी दिल्ली : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI चे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही परवानगी मिळाल्याने देश्भारातील नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना तज्ज्ञ […]

अमेरिकेचा कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतात दाखल; नव्या स्ट्रेनचे सहा रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट

अमेरिकेचा कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतात दाखल; नव्या स्ट्रेनचे सहा रुग्ण

नवी दिल्ली : भारतात अमेरिकेतील कोविड 19 चा नव्या प्रकाराचे सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार हे लोक ब्रिटनहून परत आले होते. चाचणीनंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले असून त्यांच्यात नव्या प्रकारची लक्षणे आढळली आहेत. या सर्व 6 लोकांना एका खोलीत एकाकी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही अलग ठेवण्यात येत आहे. […]

थर्टीफस्ट आणि न्यु इअर सेलिब्रेट करण्याचे आहे? मग राज्य सरकारच्या गाईडलाईन आधी वाचाच
बातमी महाराष्ट्र

थर्टीफस्ट आणि न्यु इअर सेलिब्रेट करण्याचे आहे? मग राज्य सरकारच्या गाईडलाईन आधी वाचाच

मुंबई : राज्य सरकारने राज्यभरात २२ डिसेंबर २०२० ते 5 जानेवारी २०२१ कालावधीत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू म्हणजेच रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. तर ब्रिटनमधील कोरोना व्हायरसच्या व नाताळ, नववर्ष जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे स्वागत आणि थर्टीफर्स्ट कसा साजरा करणार असा प्रश्न उभा राहिला होता. यावर राज्य सरकारने गाईडलाईन जारी केली आहे. […]

कोरोनाविरोधातील युद्ध ही जागतिक लढाई : सुप्रीम कोर्ट
कोरोना इम्पॅक्ट

कोरोनाविरोधातील युद्ध ही जागतिक लढाई : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : ”या कोरोनाच्या महामारीमुळे जगातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभावित झाला आहे. हे कोरोनाच्या विरोधातलं जागतिक महायुध्द आहे.” असे मत सर्वोच्च न्यायालयानं कोरोनासंबंधी सुनावणी करताना मांडले आहे. शुक्रवारी सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर कोरोनासंबंधी सुनावणी पार पडली. या खंडपीठात न्या. रेड्डी आणि न्या. शाह यांचा समावेश आहे. या […]

आनंदाची बातमी : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ; 95 टक्के रिकव्हरी रेट
कोरोना इम्पॅक्ट

आनंदाची बातमी : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ; 95 टक्के रिकव्हरी रेट

कोरोना विरोधातल्या लढ्यात भारताने अनेक महत्वाचे टप्पे साध्य केले आहेत. गेल्या 24 तासात पुष्टी झालेल्या नव्या रुग्णांची संख्या 22,100 च्या खाली गेली आहे. 161 दिवसानंतर दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या 22,065 झाली आहे. 7 जुलै 2020 ला नव्या रुग्णांची संख्या 22,252 होती. बरे झालेल्यांची एकूण संख्या 94 लाखापेक्षा जास्त झाली आहे (94,22,636). सक्रीय रुग्ण आणि बरे […]

गुडन्यूज! कोरोनाची लस आली; फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला युके सरकारची मंजुरी
कोरोना इम्पॅक्ट

गुडन्यूज! कोरोनाची लस आली; फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला युके सरकारची मंजुरी

लंडन : गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत ती कोरोनाची लस आली आहे. युनायटेड किंगडमने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला मंजुरी दिली आहे. दरम्यान, जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येनं 6.4 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 16 लाखांपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत तर 59 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. फायझरच्या […]