रद्द झालेल्या कसोटीबाबत बीसीसीआय आणि ईसीबीने घेतला निर्णय
क्रीडा

रद्द झालेल्या कसोटीबाबत बीसीसीआय आणि ईसीबीने घेतला निर्णय

नवी दिल्ली : भारताचा इंग्लंड दौऱ्यावरील शेवटचा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर क्रिकेट चाहते निराश झाले होते. आता या सामन्यांविषयी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून याबाबत बीसीसीआय आणि ईसीबीने एक निर्णय घेतला आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान रद्द झालेल्या मँचेस्टर कसोटीच्या जागी २०२२मध्ये भारत इंग्लंडमध्ये एक कसोटी सामना खेळेल. क्रिकेट वेबसाइट ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, भारतीय क्रिकेट […]

INDvsENG : दमदार जो रूट! सलग तिसरं शतक
क्रीडा

INDvsENG : दमदार जो रूट! सलग तिसरं शतक

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना लीड्स येथे खेळला जात आहे. पहिल्या डावात भारत केवळ ७८ धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यानंतर रोरी बर्न्स आणि हसीब हमीद या इंग्लंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स ६१ धावा काढून बाद झाला. त्यानंतर हसीब हमीदची साथ देण्यासाठी डेव्हिड मलान फलंदाजीला आला. तो […]

दुसरा दिवसही पाहुण्यांच्या नावावर; इंग्लंडने उभारला धावांचा डोंगर
क्रीडा

दुसरा दिवसही पाहुण्यांच्या नावावर; इंग्लंडने उभारला धावांचा डोंगर

चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसरा दिवसही पाहुण्या इंग्लंड संघाच्याच नावावर राहिला आहे. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडच्या संघाने ८ बाद ५५५ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार जो रूटचे दमदार द्विशतक आणि डॉम सिबली, बेन स्टोक्स यांची अर्धशतके यांच्या जोरावर इंग्लंडने धावांचा डोंगर उभारला. आजच्या दिवसातील पहिल्या दोन सत्रांवर इंग्लंडने पूर्णपणे वर्चस्व राखल्यानंतर शेवटच्या सत्रात भारतीय गोलंदाजांना काहीसं […]

शंभराव्या कसोटीत जो रुटचा आगळावेगळा विक्रम
क्रीडा

शंभराव्या कसोटीत जो रुटचा आगळावेगळा विक्रम

चेन्नई : भारताविरूद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारली आहे. कर्णधार जो रूटने दमदार खेळी केली असून त्याने धडाकेबाज द्विशतक ठोकले. रूटने या सामन्यात एक इतिहास रचला आहे. आपला १००वा कसोटी सामना खेळणाऱ्या जो रूट याने आपल्या दमदार खेळीच्या जोरावर द्विशतकी मजल मारली. त्याने १९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने द्विशतक ठोकले. आपल्या […]

पहिला दिवस इंग्लंडचा; रूटची शतकी खेळी
क्रीडा

पहिला दिवस इंग्लंडचा; रूटची शतकी खेळी

चेन्नई : भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर राहिला आहे. दिवसअखेर इंग्लंडच्या संघाने ३ बाद २६३ धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या सत्रात दोन गडी गमावल्यानंतर संपूर्ण दिवस सलामीवीर डॉम सिबली आणि जो रूट यांनी खेळून काढत संघाला भक्कम स्थितीत आणले. रूटने नाबाद शतक ठोकलं, पण सिबली शेवटच्या सत्रात ८७ धावांवर पायचीत झाला आणि […]