महाराष्ट्र हादरला! भानामतीच्या संशयातून दलित कुटुंबातील सात जणांसोबत अमानुष कृत्य
बातमी विदर्भ

महाराष्ट्र हादरला! भानामतीच्या संशयातून दलित कुटुंबातील सात जणांसोबत अमानुष कृत्य

चंद्रपूर : महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक घटना चंद्रपुरात घडली आहे. जादूटोणा आणि भानामती केल्याच्या संशयातून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी कुटुंबातील सात सदस्यांना झाडाला बांधून मारहाण केली. कुटुंबीयांना भरचौकात नेऊन त्यांचे हातपाय बांधून मारहाण करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवतीपासून 12 किमी अंतरावर असणाऱ्या अति दुर्गम भागातील वणी खुर्द गावात घडली आहे. मारहाणीत […]

मध्यप्रदेशात एकाच दलित कुटुंबातील पाच जणांची हत्या
देश बातमी

मध्यप्रदेशात एकाच दलित कुटुंबातील पाच जणांची हत्या

भोपाळ : मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील नेमवार येथे एकाच दलित कुटुंबातील पाच जणांची हत्या करून आरोपीने त्यांचे मृतदेह स्वत:च्याच मालकीच्या शेतात पुरण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या पाचही जणांचे पुरलेले मृतदेह उकरून बाहेर काढण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या कुटुंबाला अनुसूचित जाती/जमाती कायद्यान्वये ४० लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे. या […]

झाडाची पानं तोडल्याने मारहाण; दलित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
देश बातमी

झाडाची पानं तोडल्याने मारहाण; दलित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

फतेहपूर : झाडाची पानं तोडल्याने एका दलित तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे त्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील फतेहपूरमध्ये घडली आहे. आंब्याच्या झाडाची पानं तोडल्याने जमावाकडून मारहाण झालेल्या २६ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. मारहाण झाल्याने हा तरूण अतिशय नाराज झाला होता, यामुळेच त्याने आत्महत्या […]

धक्कादायक ! जेवणाला हात लावल्याच्या कारणावरुन दलित तरुणाची हत्या
देश बातमी

धक्कादायक ! जेवणाला हात लावल्याच्या कारणावरुन दलित तरुणाची हत्या

भोपाळ : जेवणाला हात लावला म्हणून एका दलित तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशमधील छत्तरपूर जिल्ह्यात घडला आहे. देवराज अनुरागी असं या मृत तरुणाचे नाव असून तो छत्तरपूरचा रहिवाशी होता. देवराजने फक्त जेवणाला हात लावला म्हणून संतापलेल्या दोन तरुणांनी त्याला बेदम मारहाण केली, यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. […]