जातिवाचक घोषणाबाजीप्रकरणी भाजप नेत्यांसह सहा जणांना अटक
राजकारण

जातिवाचक घोषणाबाजीप्रकरणी भाजप नेत्यांसह सहा जणांना अटक

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ८ ऑगस्ट रोजी निदर्शनादरम्यान केलेल्या घोषणाबाजीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी दिल्ली पोलिसांनी भाजपा नेते अश्विनी उपाध्याय यांच्यासह ६ जणांना अटक केली आहे. अश्विनी उपाध्याय व्यतिरिक्त विनोद शर्मा, दीपक सिंग, दीपक, विनीत क्रांती, प्रीत सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे. प्रीत सिंह हे सेव्ह इंडिया […]

दिल्लीमध्ये भीषण अग्नितांडव.. 30 अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी
देश बातमी

दिल्लीमध्ये भीषण अग्नितांडव.. 30 अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये भीषण अग्नी तांडव पहायला मिळत आहे. लाजपत नगरमधील कपड्यांच्या शोरूमला भीषण आग लागली आहे. अग्निशमनदलाच्या 30 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ही दिल्लीमधील सर्वात मोठी आग आहे. सेंट्रल मार्केटच्या केएफसीजवळील कपड्यांच्या शोरूमला आग लागली आहे. सकाळी 10.30 च्या सुमारास ही आग लागली आहे. कपड्यांमुळे आगीने रौद्र रूप घेतले आहे. अग्निशमन […]

मिशन अनलॉक; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
देश बातमी

मिशन अनलॉक; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतला लॉकडाउन हळूहळू उठवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. दिल्लीतल्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. वाढती संख्या पाहता लॉकडाउन करण्यात आला होता. मात्र, आता रुग्णसंख्या कमी होत असल्यानं दिल्लीतला लॉकडाउन टप्प्याटप्प्याने हटवण्यात येईल असे केजरीवाल यांनी सांगितलं आहे. केजरीवाल […]

गुजरातकडे जाणाऱ्या गाडीत कोट्यवधी रुपये; नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन्स
देश बातमी

गुजरातकडे जाणाऱ्या गाडीत कोट्यवधी रुपये; नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन्स

नवी दिल्ली : गुजरातला जाणाऱ्या एका कारमध्ये कोट्यवधींच्या नोटा सापडल्या असून त्या मोजण्यासाठी अख्खा दिवस लागला. कारमध्ये सापडलेले पैसे मोजण्यासाठी चक्क बँकेतून मशीन्स मागवाव्या लागल्या. राजस्थानातील डुंगरपूर पोलिसांनी गुजरातकडे जाणारी एक कार जप्त केली. शनिवारी राष्ट्रीय महामार्ग ८वरून ही कार गुजरातकडे जात असतानाच पोलिसांनी कारवाई केली. यावेळी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. डुंगपूर जिल्ह्यातील बिछीवाडा […]

दिल्लीतले मंत्री, आमदारच औषधं, ऑक्सिजनचा काळाबाजार करतायत; भाजपाध्यक्षांचा आरोप
देश बातमी

दिल्लीतले मंत्री, आमदारच औषधं, ऑक्सिजनचा काळाबाजार करतायत; भाजपाध्यक्षांचा आरोप

नवी दिल्ली : संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असताना दिल्लीचे भाजपाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिल्ली सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीतल्या औषधांचा आणि ऑक्सिजनचा काळाबाजार सरकारच करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गुप्ता म्हणाले, दिल्लीतले लोक केवळ श्वासासाठी लढत आहेत, भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेसारख्या इतरही संघटना लोकांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांच्या समस्या […]

दिल्लीचा मुंबईवर सहज विजय; 11 वर्षानंतर दिल्लीचा मिळाला चेन्नईत विजय
क्रीडा

दिल्लीचा मुंबईवर सहज विजय; 11 वर्षानंतर दिल्लीचा मिळाला चेन्नईत विजय

चेन्नई : दिल्ली कॅपिटल संघाने मुंबई इंडियन्स संघावर सहज विजय मिळवला आहे. दिल्ली संघात संधी मिळालेल्या अनुभवी अमित मिश्राने 4 षटकात 24 धावा देत 4 बळी घेतले. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने केवळ 4 गडी गमावले. मिश्राला सामनावीर पुरस्कार मिळाला. तब्बल ११ वर्षानंतर दिल्लीने या मैदानावर विजय साकारला आहे. याआधी 2010मध्ये त्यावेळच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने चेन्नई […]

दिल्ली कॅपिटल्सचा पंजाबवर 6 गडी राखून विजय
क्रीडा

दिल्ली कॅपिटल्सचा पंजाबवर 6 गडी राखून विजय

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जच्या 196 धावसंख्येच्या आव्हानाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या 92 धावांच्या शानदार खेळीमुळे 6 गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक गमावलेल्या पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 195 धावा केल्या होत्या. पंजाबचा कर्णधार के एल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतके रचत संघासाठी बहुमुल्य योगदान दिले. मात्र, पंजाबचे गोलंदाज दिल्लीच्या […]

दिल्लीत वीकेण्ड कर्फ्यू; मुख्यमंत्र्यांची घोषणा
देश बातमी

दिल्लीत वीकेण्ड कर्फ्यू; मुख्यमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता विकेण्ड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वीकेण्ड कर्फ्यू लावत असल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जतनेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असणार आहे. आधीपासूनच नियोजित लग्नासारख्या महत्वाच्या […]

मोदी सरकारचा अरविंद केजरीवाल सरकारला मोठा झटका; ‘प्रत्येक घरात रेशन योजने’ला स्थगिती
राजकारण

मोदी सरकारचा अरविंद केजरीवाल सरकारला मोठा झटका; ‘प्रत्येक घरात रेशन योजने’ला स्थगिती

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारनं दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारला मोठा झटका दिला आहे. येत्या २५ मार्चपासून ही योजना दिल्लीत सुरू होणार होती. परंतु दिल्ली सरकारच्या या डोअर स्टेप डिलिव्हरी योजनेवर केंद्र सरकारनं स्थगिती आणली आहे. केंद्र सरकारनं दिल्ली सरकारच्या अन्न पुरवठा विभागाच्या सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. यानुसार केंद्र सरकारनं दिल्लीत २५ मार्चपासून सुरू […]

शताब्दी एक्स्प्रेसला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही
देश बातमी

शताब्दी एक्स्प्रेसला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

नवी दिल्ली : दिल्लीतून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली. आग लागल्याचे लागल्याचे लक्षात येताच एक्सप्रेसच्या लोको पायलटने ट्रेन थांबवत आग लागलेले कोचमधून प्रवाश्यांना बाहेर काढत कोच ट्रेनपासून वेगळे केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणताही प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. आगीची माहिती मिळताच एडीआरएन एन.एन. सिंह आणि अन्य […]