जपानमधील गुंतवणूकदारांकडून राज्यात मोठ्या गुंतवणूकीची शक्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बातमी मुंबई

जपानमधील गुंतवणूकदारांकडून राज्यात मोठ्या गुंतवणूकीची शक्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि.26: जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरूनजपान दौऱ्यावर गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत आगमन झाले. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आगमनानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जपानच्या या दौऱ्यात जपान सरकारचे मंत्री, पंतप्रधानाचे सल्लागार, विविध कंपन्या, अधिकारी,प्रांतांचे गव्हर्नर, कंपन्या, एंजन्सी यांच्यासोबत आपण […]

अण्णा हजारे भारावले, देवेंद्र फडणवीसांचे केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, ध्येयवादी माणसेच…
राजकारण

अण्णा हजारे भारावले, देवेंद्र फडणवीसांचे केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, ध्येयवादी माणसेच…

अहमदनगर : तब्बल बारा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर राज्यात लोकायुक्त कायद्याचे विधेयक विधिमंडळात येत असल्याने यासाठी पाठपुरावा करीत असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केले आहे. याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले. ते म्हणाले, ‘सत्तेची हवा डोक्यात गेल्यावर अनेक लोक बदलतात, मात्र काही ध्येयवादी लोक नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत असतात.’ हे विधेयक आणत […]

कर्नाटक भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांना जाहीर आव्हान, ट्वीट करत म्हणाले “सोलापूर, अक्कलकोटही…”
राजकारण

कर्नाटक भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांना जाहीर आव्हान, ट्वीट करत म्हणाले “सोलापूर, अक्कलकोटही…”

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांच्या ग्रामपंचायतींनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा ठराव केल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. बोमय्या यांनी मंगळवारी केला होता. मात्र, राज्य सरकारने तो फेटाळून लावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. जत तालुक्यातील काही गावांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा राज्य सरकार तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींनी बुधवारी […]

राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस हेच चालवतायेत; पहिल्याच पत्रकारपरिषदेत संजय राऊतांची ‘गुगली’
राजकारण

राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस हेच चालवतायेत; पहिल्याच पत्रकारपरिषदेत संजय राऊतांची ‘गुगली’

मुंबई: मी तुरुंगात असताना राज्य सरकारने काही चांगले निर्णय घेतले आहेत. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. माझ्या काही कामासंदर्भात मी आता त्यांना भेटायला जाणार असल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. यावेळी तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी म्हटले की, मला वाटतं […]

ओ बसा हो! अखेर फडणवीसांनी सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदाच्या ‘खुर्चीवर बसवले’
राजकारण

ओ बसा हो! अखेर फडणवीसांनी सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदाच्या ‘खुर्चीवर बसवले’

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सकाळी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन त्यांनी कामकाजाला प्रारंभ केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. फडणवीसांनी शिंदेंना खुर्चीवर बसवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. एकनाथ शिंदे यांच्या रुपाने सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवून शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं […]

“फडणवीसांना घोड्यावरून उतरून गाढवावर बसावं लागलं”
राजकारण

“फडणवीसांना घोड्यावरून उतरून गाढवावर बसावं लागलं”

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आलं आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असून उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिल्यानंतर फडणवीसांना उपमुख्यमंत्री […]

काँग्रेसचे प्रमुख नेते फडणवीसांच्या भेटीला! हे आहे कारण
राजकारण

काँग्रेसचे प्रमुख नेते फडणवीसांच्या भेटीला! हे आहे कारण

मुंबई : राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी आज रजनी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, […]

भाजपकडून देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक महत्वाची जबाबदारी
राजकारण

भाजपकडून देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक महत्वाची जबाबदारी

नवी दिल्ली : पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकींसाठी भाजपने केंद्रीय मंत्री तसेच, प्रमुख नेत्यांकडे प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोव्याच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने दिली आहे. त्याचबरोबर केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी व केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश हे सहप्रभारी असतील. भाजपसाठी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून या राज्यासाठी सत्ताधारी पक्षाने […]

मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा
राजकारण

मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेवर हल्लाबोल करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची बातमी समोर आली आहे. ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक आज सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ही वेगळी भेटी झाली. या वेगळ्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. […]

फडणवीसांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली
राजकारण

फडणवीसांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वापरलेल्या अपशब्दांमुळे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या विधानाचं समर्थन देण्यास नकार दिला. त्यांची ही प्रतिक्रिया कौतुकास्पद होती, त्यामुळे त्यांनी राणेंना जागा दाखवून दिली, असा टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लगावला. फडणवीस यांनी नारायण […]