जिल्हा परिषद पोटनिवडणूक : भाजपच्या होमपिचवर काँग्रेसचा जोरदार विजय
राजकारण

जिल्हा परिषद पोटनिवडणूक : भाजपच्या होमपिचवर काँग्रेसचा जोरदार विजय

नागपूर : नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. नागपूरमधील १६ जागांपैकी काँग्रेसने ९ जागांवर विजय मिळवत ग्रामीण नागपूरवर आपला दबदबा दाखवून दिला आहे. यानंतर ३ जागांसह भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर २ जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. नागपूरमधील दवलामोटी गणाच्या मतमोजणीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अवघ्या १० मिनिटात आधी घोषित निकाल बदलल्याचं […]

ईडी, सीबीआयनंतर अनिल देशमुखांच्या घरी आयकर विभागाचे छापे!
राजकारण

ईडी, सीबीआयनंतर अनिल देशमुखांच्या घरी आयकर विभागाचे छापे!

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या काटोल येथील घरासोबतच जिल्ह्यातल्या त्यांच्याशी संबंधित ६ ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकले आहेत. त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांनंतर अडचणीत आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आता ईडी आणि सीबीआयनंतर आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येनं आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काटोलमधील […]

अनिल देशमुखांच्या घरांवर छापे; ईडीची मोठी कारवाई
बातमी महाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या घरांवर छापे; ईडीची मोठी कारवाई

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर ईडीने छापे टाकले आहेत. नागपूरसह वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून एकीकडे अनिल देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसऱ्या टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आला असून झाडाझडती सुरु केली आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या नागपुरातील जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या […]

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना; पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना; पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

नागपूर : महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना उपराजधानी नागपूरमध्ये घडली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली असून हत्या केल्यानंतर कुटुंबप्रमुखाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. नागपुरच्या पाचपावली या भागातील ही घटना आहे. नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आलोक माथुरकर याने आपली पत्नी, […]

धक्कादायक ! राज्याच्या माजी मंत्र्यांचे कोरोनामुळे निधन
बातमी विदर्भ

धक्कादायक ! राज्याच्या माजी मंत्र्यांचे कोरोनामुळे निधन

चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून यातून कोणीही सुटताना दिसत नाहीये. राज्याचे माजी पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, वरोरा-भद्रावती विधानसभेचे माजी आमदार संजय देवतळे यांचे आज (ता. २५) नागपुरात कोरोनावरील उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ यांच्यासह मोठा परिवार आहे. मृदू स्वभावाचे राजकारणी […]

सिनेस्टाईल पाठलाग करुन नागपूरच्या लेडी डॉनची भररस्त्यात हत्या
बातमी विदर्भ

सिनेस्टाईल पाठलाग करुन नागपूरच्या लेडी डॉनची भररस्त्यात हत्या

नागपूर : नागपूरमध्ये कोरोनाचा अक्षरशः कहर सुरु असतानाच गुन्हेगारीचे सत्रही सुरू असल्याचे समोर आले आहे. शहरातील पाचपावली भागात एका लेडी डॉनचा गुंडांनी पाठलाग करून चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं नागपूर शहर हादरलं आहे. पिंकी वर्मा असं या लेडी डॉनचे नाव आहे. पाचपावली भागात एक तरुणी आपला जीव वाचवण्यासाठी […]

…म्हणून तन्मय फडणवीसला दिला लसीचा दुसरा डोस; रुग्णालयानं दिलं स्पष्टीकरण
बातमी विदर्भ

…म्हणून तन्मय फडणवीसला दिला लसीचा दुसरा डोस; रुग्णालयानं दिलं स्पष्टीकरण

नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीसला पात्र नसतानाही लसीचा दुसरा डोस मिळाल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर या चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे लसींचा तुटवडा निर्माण झाला असताना सर्वसामान्यांना सुविधा मिळत नसताना तन्मय फडणवीसला लस कशी मिळाली असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान तन्मय फडणवीसला […]

नागपूरात परिस्थिती हाताबाहेर; कोरोनाबळींची वाढली संख्या
बातमी विदर्भ

नागपूरात परिस्थिती हाताबाहेर; कोरोनाबळींची वाढली संख्या

नागपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असताना नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहायला मिळत आहे. नागपुरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली असून एका दिवसांत आतापर्यंतच्या सर्वाधिक ११३ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यातील ७५ मृत्यू केवळ नागपूर शहरात झाले आहेत. त्यामुळे एकूणच परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, आणखी ६ […]

चिंताजनक ! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १०पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात
कोरोना इम्पॅक्ट बातमी

चिंताजनक ! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १०पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढत असून हा चिंतेचा विषय बनला आहे. यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. दोन जिल्हे सर्वाधिक चिंतेचा विषय आहे जिथे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही […]

नागपूरनंतर आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा
कोरोना इम्पॅक्ट

नागपूरनंतर आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा

परभणी : नागपूरनंतर कोरोना संसार्गावर आला घालण्यासाठी आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण्संख्येला रोखण्यासाठी परभणी जिल्ह्यात १३ आणि १४ मार्च रोजी लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. परभणी हा पुन्हा लॉकडाऊन होणार राज्यातील दुसरा जिल्हा आहे. आज मध्यरात्रीपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन […]