महाविकास आघाडी सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती आली आहे; प्रवीण दरेकरांची टीका
राजकारण

महाविकास आघाडी सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती आली आहे; प्रवीण दरेकरांची टीका

मुंबई : ”महाविकास आघाडी सरकारमध्ये संवेदना उरलेली नाही, सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती आली आहे, असा आरोप करत आघाडीच्या एका आमदाराचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत, असे म्हणत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि […]

संजय राठोडांचा राजीनामा राज्यपालांपर्यंत पोहचलाच नाही? पण का?
राजकारण

संजय राठोडांचा राजीनामा राज्यपालांपर्यंत पोहचलाच नाही? पण का?

पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेना नेते संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही राठोड यांचा राजीनामा फ्रेम करण्यासाठी नाही, असं म्हणत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, संजय राठोड यांचा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे पोहोचलाच नसल्याचं वृत्त समोर आले आहे. त्यामुळे आता राठोड यांच्या […]

संजय राठोडांच्या अडचणी वाढल्या; पूजा चव्हाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
बातमी महाराष्ट्र

संजय राठोडांच्या अडचणी वाढल्या; पूजा चव्हाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी अॅड. आर. एन. कछवे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी […]

पूजा चव्हाण प्रकरण : पुजाच्या वडिलांनीच आजीविरोधात दाखल केला गुन्हा
बातमी मराठवाडा

पूजा चव्हाण प्रकरण : पुजाच्या वडिलांनीच आजीविरोधात दाखल केला गुन्हा

बीड : पूजा चव्हाण मृत्युप्रकरणी विरोधी पक्षाच्या वाढत्या दबावानंतर शिवसेना नेते संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे पुजाची चुलत आजी शांताबाई चव्हाण यांनी केलेल्या धक्कादायक खुलाश्यांमुळे या प्रकरणाला नवे वळण लागले होते. अशातच आता या प्रकरणात पुन्हा एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड […]

तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण यांना वानवडी पोलिसांकडून नोटीस
पुणे बातमी

तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण यांना वानवडी पोलिसांकडून नोटीस

पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी रविवारी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणात राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. त्यानंतरही हा वाद थांबण्याची कोणतीही चिन्हे अद्याप तरी दिसत नाहीत. याचे कारण म्हणजे वानवडी पोलिसांनी पुजाची चुलत आजी शांताबाई चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना बजावलेली नोटीस.तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करत […]

पूजाच्या आजीचा मोठा गौप्यस्फोट; संजय राठोडांनी पूजाच्या आईवडिलांना….
बातमी मराठवाडा

पूजाच्या आजीचा मोठा गौप्यस्फोट; संजय राठोडांनी पूजाच्या आईवडिलांना….

पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी रविवारी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणात राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. त्यानंतर हे प्रकरण शांत होईल, असे वाटत असताना तिच्या चुलत आजीने मोठा गौप्यस्फोट केला आहे. ”पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले, त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्याऱ्याविषयी बोलायचे नाही आणि पैशामुळे माझे चुलत आजीचे नातेही त्यांना दिसत […]

पूजा चव्हाण प्रकरण: नाहीतर आम्ही भाजपाचे सर्व आमदार राजीनामा देणार; देवेंद्र फडणवीसांचा इशारा
राजकारण

पूजा चव्हाण प्रकरण: नाहीतर आम्ही भाजपाचे सर्व आमदार राजीनामा देणार; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मुंबई : ”महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकारनं शक्ती कायदा आणण्याची तयारी सुरू केली आहे. दिशा कायद्यासाठी सरकारनं समिती स्थापन केली आहे. पण एका मंत्र्यावर इतके गंभीर आरोप होत असताना मुख्यमंत्री ठाकरे त्यांचा राजीनामा घेत नाहीत. राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, तर आम्ही दिशा कायद्यासाठी गठित समितीतून राजीनामे देऊ,’ असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस […]

चित्रा वाघांना राष्ट्रवादीच्या नेत्याचे प्रत्युत्तर; आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात, त्यामुळे…
राजकारण

चित्रा वाघांना राष्ट्रवादीच्या नेत्याचे प्रत्युत्तर; आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात, त्यामुळे…

मुंबई : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. त्यानंतर चित्रा वाघ यांनी त्यांना छळलं जात असल्याचा आरोप केला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सरकारला जाब विचारल्यामुळेच ही कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता या आरोपाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. […]

पूजा चव्हाण मृत्युप्रकरण; ‘शरद पवार, जागे व्हा’ घोषणाबाजी करत भाजपाचे आंदोलन
राजकारण

पूजा चव्हाण मृत्युप्रकरण; ‘शरद पवार, जागे व्हा’ घोषणाबाजी करत भाजपाचे आंदोलन

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्य सरकारने संजय राठोड यांच्यावर यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने भाजपाने आक्रमक भूमिका घेत आज पनवेलमध्ये आंदोलन केलं. पनवेल माहनगरपालिकेच्या महापौर कविता चौतमोल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये कळंबोली येथे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत आंदोलकांना […]

चित्रा वाघांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; संजय राठोडांवर थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
राजकारण

चित्रा वाघांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; संजय राठोडांवर थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नाशिक : आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी असते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्ल असतं. मुख्यमंत्री साहेब खरचं खुर्ची एवढी वाईट आहे का? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. तसेच, आम्ही विरोधी पक्षात असलो तरी आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे. 21 दिवस झाले तर एफआयआर देखील झाली नाही. मला विश्वास […]