पुण्यात चोराचा पाठलाग करणार्‍या तरुणावर भरदिवसा गोळीबार
पुणे बातमी

पुण्यात चोराचा पाठलाग करणार्‍या तरुणावर भरदिवसा गोळीबार

पुणे : पुण्यातील खडकमाळ आळीत एका इमारतीमध्ये चोरी करणार्‍या आरोपीचा पाठलाग करणार्‍या तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विठ्ठल वामन बोळे असे आरोपीचे नाव आहे. तर आवेज सलीम अन्सारी (वय-23) असे जखमी तरुणीचे नाव आहे. पोलिसांना त्या आरोपीला पकडण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खडकमाळ येथील […]

उसाच्या शेतात लपवला ५८ लाखांचा गांजा; अन्…
पश्चिम महाराष्ट्र बातमी

उसाच्या शेतात लपवला ५८ लाखांचा गांजा; अन्…

पाथर्डी : नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात उसाच्या शेतात लपवलेला ५८ लाख रुपयांचा गांजा पोलिसांना सापडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ७२१ किलो १४२ ग्रॉम वजनाच्या या गांजाची किंमत सुमारे ५७ लाख ६९हजार १३६ रुपये असावी. पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी येथे आज, रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. तहसीलदार व वजन मापे […]

व्यावसायिकाची डोक्यात गोळ्या झाडून हत्या; पोलिसांकडून २४ तासांत छडा
बातमी विदर्भ

व्यावसायिकाची डोक्यात गोळ्या झाडून हत्या; पोलिसांकडून २४ तासांत छडा

गोंदिया : गोंदिया शहरात व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी डोक्यात गोळ्या झाडून हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोंदिया शहरातील गणेश नगर येथे राहणारे अशोक कौशिक या ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाची मॉर्निग वाकला जात असतांना एका अज्ञात आरोपीने पाठीमागून येत त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली. हत्येनंतर आरोपीने घटना स्थळापासून काही अंतरावर बंदूक […]

दिल्ली पोलिसांना महागात पडली सुशील कुमारसोबत फोटो काढण्याची हौस
क्रीडा

दिल्ली पोलिसांना महागात पडली सुशील कुमारसोबत फोटो काढण्याची हौस

नवी दिल्ली : अटकेत असताना कुस्तीपटू सुशिलकुमारसोबत फोटो काढण्याची हौस दिल्ली पोलिसांना चांगलीच महागात पडली आहे. शुक्रवारी सुशीलकुमारला मंडोली तुरुंगातून तिहार जेलमध्ये हलवण्यात आलं. यावेळी मंडोली तुरुंगाबाहेर दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारसोबत काढलेले फोटो आणि सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटोसेशन आता पोलिसांना चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात […]

मुस्लीम तरुणाशी लग्न केल्याने वडिलांनी ८ वर्षांनी केला मुलीचा खून
देश बातमी

मुस्लीम तरुणाशी लग्न केल्याने वडिलांनी ८ वर्षांनी केला मुलीचा खून

नवी दिल्ली : इतर धर्मातील पुरूषाशी लग्न केल्याने ८ वर्षांनंतर स्वतःच्या मुलीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील सिद्दार्थ नगर येथील चिल्हीया परिसरात घडला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून याप्रकरणी ५५वर्षीय मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. सुनीता तिचा शेजारी अब्दुल मोतीन सोबत २०१३ला मुंबईला पळून गेली. तिचे कुटुंबीय या नात्याच्या विरोधात होते. […]

उत्तर प्रदेशात हजारो मुलं-महिलांचं धर्मांतर! एटीएसकडून पर्दाफाश
देश बातमी

उत्तर प्रदेशात हजारो मुलं-महिलांचं धर्मांतर! एटीएसकडून पर्दाफाश

लखनौ : उत्तर प्रदेशात हजारो मुलं-महिलांचं धर्मांतर झाल्याचे उघड झाले असून याचा एटीएसकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. एटीएसने आज (ता. २१) सोमवारी मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली असून राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या धर्मांतर रॅकेटचा ते भाग असल्याचं पोलिसांनी म्हटलं […]

गडचिरोलीमध्ये सी-60 कमांडोंच्या चकमकीत 2 माओवाद्यांचा खात्मा
बातमी विदर्भ

गडचिरोलीमध्ये सी-60 कमांडोंच्या चकमकीत 2 माओवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून माओवाद्यांनी डोके वर काढले आहे. सावरगावलगत सी-60 कमांडो आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. चकमकीत दोन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली पोलिसांच्या सी सिक्स्टी पथकाच्या जवानाचे अभियान सुरू केले आहे. अभियान सुरू असताना माओवाद्यांनी अचानक पथकावर गोळीबार केला. त्याला जवानांनी जशास तसे प्रतिउत्तर दिले. अर्ध्या तासाच्या चकमकीनंतर दोन […]

भाजप खासदारांविरुद्ध वर्धा पोलिसांत गुन्हा दाखल
बातमी विदर्भ

भाजप खासदारांविरुद्ध वर्धा पोलिसांत गुन्हा दाखल

वर्धा : भाजप खासदार रामदास तडस यांच्याविरुद्ध वर्धा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी आमदार रणजित कांबळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपचे खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी खासदार तडस […]

महाराष्ट्रात चाललंय काय? पोलिसांना पाठलाग करुन मारहाण; व्हिडीओ व्हायरल
उत्तर महाराष्ट् बातमी

महाराष्ट्रात चाललंय काय? पोलिसांना पाठलाग करुन मारहाण; व्हिडीओ व्हायरल

संगमनेर : राज्यात कोरोनाचं संकट वाढत असून काही ठिकाणी हिंसक घटना घडत असल्याचे समोर येत आहे. नियमांचं उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असल्याने पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये गर्दी जमा केल्याबद्दल जाब विचारणाऱ्या पोलिसांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना […]

गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलेल्या दाव्यामुळे भाजपच्या वाढणार अडचणी
राजकारण

गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलेल्या दाव्यामुळे भाजपच्या वाढणार अडचणी

मुंबई : भारतीय जनता पक्षासाठी एक अडचणीची ठरणारी बातमी असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या एका दाव्यामुळे भाजपसमोरील अडचणी वाढणार आहेत. ‘भाजपचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून, त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व घेतल्याची तक्रार मला पात्र झाली होती. त्या तक्रारीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे […]